Mon, Sep 24, 2018 03:27होमपेज › Belgaon › अकरा भक्‍तांवर काळाचा घाला

अकरा भक्‍तांवर काळाचा घाला

Published On: Jan 14 2018 1:51AM | Last Updated: Jan 13 2018 11:39PM

बुकमार्क करा
बंगळूर : प्रतिनिधी

धर्मस्थळला देवदर्शनासाठी निघालेली व्होल्वो बस हासनजवळ महामार्गालगतच्या खड्ड्यात कोसळून आठ भक्‍त जागीच ठार झाले तर 30 जण जखमी झाले. तर कोलार जिल्ह्यात देवदर्शनाहून परतणा़़र्‍या भक्‍तांच्या रिक्षाने झाडाला धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला. त्यात 10 जण जखमी  आहेत.  कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची बस बंगळूरहून निघाली होती. या अपघातात ठार झालेल्यांमध्ये चालक लक्ष्मण (वय 45), वाहक शिवप्पा चलवादी 

(40), मंगळूरचा दयान (22), बंगळूरचा एन गंगाधर (30), बेळतांगडीचा  बिजो (26), सोनिया (28), धर्मस्थळचे गंगाधर  (36) यांचा समावेश आहे. एका मृताचे नाव समजू शकले नाही.  30 जखमींना हासन जिल्ह्यातील विविध इस्पितळांमध्ये दाखल करण्यात आले आहे. चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे जिल्हा पोलिसप्रमुख राहुलकुमार यांनी सांगितले. 

बसचालक झोपेच्या अधीन झाल्यामुळे किंवा मद्यप्राशन करून बस चालविल्यामुळे हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 3 लाख भरपाई देण्याचा आदेश वाहतूकमंत्री एच. एम. रेण्णा यांनी बजाविला  आहे. कोलारमध्ये रिक्षा अपघातामध्ये भास्कर, पार्वतम्मा व गौरम्मा यांचा मृत्यू झालेला आहे. ते करीपुरा येथील मंदिराला भेट देऊन परतत  होते.