Thu, Sep 20, 2018 16:22



होमपेज › Belgaon › बारावीचा निकाल महिनाअखेर, तर दहावीचा 7 मे रोजी

बारावीचा निकाल महिनाअखेर, तर दहावीचा 7 मे रोजी

Published On: Apr 07 2018 1:40AM | Last Updated: Apr 07 2018 12:07AM



बंगळूर : पुढारी ऑनलाईन

दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल 7 मे रोजी जाहीर होईल, तर 8 मे रोजी प्रत्येक हायस्कूलमध्ये तो जाहीर होईल, अशी माहिती शिक्षणंत्री तन्वीर सेठ यांनी दिली. गेल्या महिन्यात संपलेल्या बारावी परीक्षेचा निकाल एप्रिलअखेर जाहीर होईल, असेही त्यांनी सांगितले. दहावीची परीक्षा शुक्रवारी संपली.

मूल्यांकनाचे काम पुढच्या आठवड्यात सुरू होईल. महिन्यात निकाल तयार होईल, असे सेठ यांनी स्पष्ट केले. तसेच बारावीचा निकालही या महिनाअखेरीस जाहीर होईल. बारावीच्या मूल्यांकनावर प्राध्यापकांनी बहिष्काराचा इशारा दिला होता. मात्र, प्राध्यापक संघटना आणि शिक्षण खात्यामध्ये झालेल्या चर्चेतून मूल्यांकनाच्या मानधनावर तोडगा निघाल्याने मूल्यांकनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
 

 

 

tags ; Bangalore,news, Online, result, of SSC,XII, exam,