होमपेज › Belgaon › आज ‘उ. कर्नाटक बंंद’ची हाक

आज ‘उ. कर्नाटक बंंद’ची हाक

Published On: Dec 27 2017 1:23AM | Last Updated: Dec 27 2017 12:09AM

बुकमार्क करा

बंगळूर : प्रतिनिधी

म्हादई नदी  पाणी वाटपाचा प्रश्‍न तातडीने निकालात काढा, या मागणीसाठी बंगळूरमधील भाजपचे मुख्यालय जगन्नाथ भवनसमोर दिवशीही आंदोलन चालूच ठेवले असून विविध शेतकरी संघटनांनी बुधवारी (दि. 27) उत्तर कर्नाटक बंदची हाक दिली आहे; मात्र बेळगाव, खानापूर , चिकोडी, हुक्केरी तालुक्यातील शाळा, महाविद्यालये सुरू राहतील. या बंदमधून इस्पितळे, औषध दुकाने, रुग्णावाहिका व अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक वगळली आहे. 

म्हादई पाणी वाटपाचा प्रश्‍न गोव्याबरोबर समझोता करून लवकर निकालात काढण्यासाठी आपण तत्पर असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांनी भाजप कोर कमिटीच्या बैठकीनंतर सांगितले.शेतकरी आंदोलक भाजपच्या मुख्यालयासमोर आंदोलन करीत आहेत. ते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निवासासमोर आंदोलन का करीत नाहीत, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला आहे. 
बुधवारच्या बंदमुळे व्हीटीयूची परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. उद्या होणारी परीक्षा 29 डिसेंबर आणि 8 जानेवारीला होईल, असे व्हीटीयूने पत्रकाद्वारे कळवले आहे.