Mon, Apr 22, 2019 12:21होमपेज › Belgaon › जलसिंचन लाचप्रकरणी येडियुराप्पांवर खटला?

जलसिंचन लाचप्रकरणी येडियुराप्पांवर खटला?

Published On: Apr 07 2018 1:40AM | Last Updated: Apr 06 2018 11:56PMबंगळूर : प्रतिनिधी

कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस सरकार माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्यावर एका कंत्राटदाराकडून 4 कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली खटला दाखल  करणार आहे. अप्पर भद्रा योजनेमध्ये 2009 ते 2011 या कालावधीमध्ये त्यांनी 4 कोटी रुपयांची रक्‍कम घेतल्याचा  आरोप आहे. काँग्रेसचे प्रवक्‍ते व्ही. एस. उग्राप्पा म्हणाले, आयकर खात्याने हिशेब केल्याप्रमाणे येडियुराप्पांनी 4 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे.

आरएनएस इन्फ्रास्ट्रक्‍चरवर 2015 मध्ये आयकरने धाड घातल्यानंतर ही बाब उघडकीस आली. त्यावेळी येडियुराप्पा कर्नाटक निरावरी निगमचे चेअरमन होते. त्यावेळी त्यांनी तीनवेळा रक्‍कम स्वीकारलेली असून ती 4 कोटींपेक्षा जास्त आहे. येडियुराप्पांनी त्या रकमेचा आपल्या आयकर विवरणपत्रात उल्लेख  केलेला नाही.  त्यांच्या या भ्रष्टाचाराबद्दल उग्राप्पा  आश्‍चर्य व्यक्‍त करून म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा     

यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री म्हणजे 10 टक्के कमिशन घेणारे मुख्यमंत्री अशी टीका केली आहे. आता ते येडियुराप्पांवर कोणती कारवाई करणार?  सध्या अप्पर भद्रा जलसिंचन कालव्याचे 1100 कोटी रुपयांचे काम चाललेले आहे. 
 

 

 

tags ; Bangalore,news,Congress, government, former, Chief, Minister, B. S. Yediyurappa, Irrigation, Bribery, Case,