Wed, Nov 21, 2018 03:11होमपेज › Belgaon › तंबाखूजन्य रोगांमुळे रोज कर्नाटकात 20 जणांचा मृत्यू

तंबाखूजन्य रोगांमुळे रोज कर्नाटकात 20 जणांचा मृत्यू

Published On: Jan 13 2018 1:11AM | Last Updated: Jan 12 2018 11:41PM

बुकमार्क करा
बंगळूर : प्रतिनिधी

कर्नाटकामध्ये  तंबाखूमुळे होणार्‍या कर्करोगामुळे रोज20 जणांचा मृत्यू होतो, असा अहवाल  ‘ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्व्हे’द्वारे जाहीर करण्यात आला आहे. हा सर्व्हे ‘टाटा इन्सिट्यूट ऑफ सोशल सायन्स’ यांनी केला आहे. यासंबंधी कर्नाटक विधानसभेचे उपसभापती एन. एच. शिवशंकर रेड्डी यांनी म्हटले आहे की, कर्नाटकामध्ये दरवर्षी तंबाखूद्वारे निर्माण होणार्‍या रोगामुळे 2680 नागरिकांचा मृत्यू होतो. 2009-2010 मध्ये तंबाखूचा वापर 28.2 टक्के नागरिकांकडून केला जात होता. तर 2016-17 मध्ये 22.8 टक्के नागरिकांकडून तंबाखूचा वापर केला जात होता. हे राष्ट्रीय पातळीवरील प्रमाण 30 टक्के इतके आहे. धुम्रपान करणार्‍यांची संख्या 11.9 टक्क्यांवरून 8.8 टक्क्यांवर आलेली आहे. तंबाखूचा वापर 15 ते 17 वयोगटातील युवकांकडून केला जातो. ते प्रमाण आता 6.8 टक्क्यांवरून 3.7 टक्क्यांवर आले आहे.