Tue, Apr 23, 2019 19:34होमपेज › Belgaon › अंकोल्याच्या वनाधिकार्‍यासह राज्यात 11 अधिकार्‍यांवर धाडी

अंकोल्याच्या वनाधिकार्‍यासह राज्यात 11 अधिकार्‍यांवर धाडी

Published On: Dec 14 2017 1:44AM | Last Updated: Dec 14 2017 12:16AM

बुकमार्क करा

बंगळूर ः विशेष प्रतिनिधी  

राज्यातील बंगळूर, मंगळूर, तुमकूर, चिक्कबळ्ळापूर, मंड्या, धारवाड, बेळगाव, बळ्ळारीसह 11 अधिकार्‍यांवर एकाचवेळी एसीबीच्या अधिकार्‍यांनी धाडी टाकल्या. त्यामध्ये  अंकोल्याचे वनाधिकारी पांडुरंग पै यांच्यासह राज्यातील पाटबंधारे, कृषी, अरण्य आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांचा समावेश आहे. त्यांची निवासस्थाने आणि कार्यालयांवर छापे टाकून बेहिशेबी मालमत्ता जप्त केल्याची माहिती एसीबीचे महासंचालक के. व्ही. शरदचंद्र यांनी दिली.बंगळूर फॅक्टरी आणि बॉयलर खात्याचे उपसंचालक वासण्णा, योजना विभागाचे उपसंचालक एम. सी. शशिकुमार, बंगळूर महानगरपालिका बसवणगुडीचे सहायक अभियंता त्यागराज, विजयनगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त शाक्षावाली यांच्यासह 11 जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. 

बेहिशेबी मालमत्ता जप्त वासण्णा यांच्या कामगार भवनामधील कार्यालय, घर, त्याचप्रमाणे शिवकुमार यांचे कार्यालय घर आणि त्यागराज यांच्या घरावरही छापा घालण्यात आला. शिमोगाचे पाटबंधारे खात्याचे मुख्यअभियंता मल्लाप्पा यांच्या शरावतीनगरमधील निवासस्थानावर बेकायदा मालमत्ता जप्त करण्यात आली. याचप्रमाणे विजयनगर विकास प्राधिकारचे आयुक्त शाक्षावाली यांच्या बळ्ळारी येथील कुवेंंपूनगरमधील घर, ईदगा मैदानावरील निवासस्थान तसेच तीन घरे, फार्महाऊसवर छापा टाकण्यात आला. अंकोलामधील वनविभागाचे  एसीएफ पांडुरंग पै यांच्या हुबळीतील गंगाधर ले-आऊटमधील निवासस्थान, धारवाडमधील सिल्व्हर आरकेडमधील दोन घरांवर छापा टाकण्यात आला. तसेच बंटवाळ येथील कृषी खात्याचे सहाय्यक संचालक पी. एफ. निराँड, कोरटगेरे सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंता जगदीश आणि चिक्कबळ्ळापूर लघुपाटबंधारे खात्याचे सहाय्यक कार्यनिर्वाहक अभियंता हेमंत या सर्वांच्या कार्यालय निवासस्थान आणि फार्महाऊसवर छापे घालून बेहिशेबी  मालमत्ता जप्त करण्यात आली.