Sat, Nov 17, 2018 01:41होमपेज › Belgaon › 'वंदे मातरम्'वरून राहुल गांधी वादात

'वंदे मातरम्'वरून राहुल गांधी वादात

Published On: Apr 29 2018 2:09AM | Last Updated: Apr 29 2018 12:44AMबेळगाव  ः

अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळूर जिल्ह्यातील बंटवालमध्ये काँग्रेस मेळाव्यानंतर शुक्रवारी वंदेमातरम हे राष्ट्रीय गीत मध्येच थांबविण्यास सांगितल्याचा आरोप भाजपने केला असून, त्यावर टीकाही केली आहे. वेळापत्रकाप्रमाणे बंटवालमधून पुढे जाण्यासाठी राहुल यांनी वंदेमातरम् मध्येच थांबविण्याचा आदेश दिला. त्यावर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस पी. मुरलीधर राव  म्हणाले, काँग्रेस व त्यांच्या नेत्यांना स्वातंत्र्य आंदोलनातील वंदेमातरम् या राष्ट्रीय गीताचा व स्वातंत्र्य सैनिकांच्या ध्येयाचाच विसर पडला आहे.

याप्रकारे राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाचा अवमान केला आहे. त्यांनी राष्ट्राची क्षमा मागितली पाहिजे.