Thu, Jun 27, 2019 02:35होमपेज › Belgaon › ‘निपाणी इंडस्ट्रीअल’वर भाजपचा झेंडा

‘निपाणी इंडस्ट्रीअल’वर भाजपचा झेंडा

Published On: Aug 05 2018 1:28AM | Last Updated: Aug 04 2018 11:12PMनिपाणी : प्रतिनिधी

निपाणी परिसरातील औद्योगिक क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या निपाणी  को-ऑप इंडस्ट्रीयल इस्टेट या  संस्थेच्या शनिवारी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप पुरस्कृत निपाणी औद्योगिक विकास आघाडीचे पॅनेल  विजयी झाले. विरोधी सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांचा  पराभव झाला.

संस्थेच्या स्थापनेनंतर प्रथमच झालेल्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष शंतनू मानवी यांच्या पॅनेलला सत्तेबाहेर करून निपाणी औद्योगिक विकास आघाडीचे पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी  विजय मिळवला. सकाळी 8 ते 4 वाजेपर्यत झालेल्या निवडणुकीत 405 सभासदांपैकी 384 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर लगेचच निवडणूक निर्णय अधिकारी सतीश मुसंडी व सचिव बाळकृष्ण मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सभागृहात मतमोजणी करण्यात आली. अवघ्या अर्धा तासातच औद्योगिक विकास पॅनेलचे सर्व उमेदवार आघाडीवर असल्याचे समजताच भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. 

विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते पुढीलप्रमाणे ः 
गणपती गाडीवड्डर (242), प्रल्हाद दाभोळे  (236), चेतन स्वामी (246), अविनाश पाटील (231), जितेंद्र कमते (229), प्रभाकर चिमगांवे (220), लखमगोंडा उर्फ कुमार पाटील (218), मधुकर जासूद (206), बाळासाहेब जोरापूरे (231), वैशाली व्हनशेट्टी (234),  सारिका पाटील (232) मते मिळाली.

पराभूत उमेदवारांना पडलेली मते अशी ः युवराज कांबळे (133), आण्णासो सूर्यवंशी (137), मुबारक सौदागर (126), करूणा फेगडे (137), सुरेखा खवरे (136), गीतन शाह (9), राजाराम कुलकर्णी (126), शंतनू मानवी (177), सुधाकर थोरात (132), सुपार्श्‍व नवले (146), सुरेश तिबिले (17), संदीप खवरे (140).

एकूण 11 जागांसाठी 24 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये दोन अपक्षांचा समावेश होता. तर अर्ज माघारीवेळी एसटी प्रवर्गातून आनंदा नाईक  हे बिनविरोध निवडून आले होते.  बसवेश्‍वर ठाण्याचे पीएसआय प्रकाश बनहट्टी यांनी बंदोबस्त ठेवला होता.विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी केली.