Wed, Jul 24, 2019 08:31होमपेज › Belgaon › निपाणी, चिकोडीवर भाजपचे वर्चस्व

निपाणी, चिकोडीवर भाजपचे वर्चस्व

Published On: Sep 04 2018 1:16AM | Last Updated: Sep 04 2018 1:16AMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीतील कौल कायम राखताना निपाणीवासीयांनी नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक 13 जागा भाजपल्या दिल्या. तर काँग्रेस 12 जागांसह दुसर्‍या क्रमांकावर राहिला आहे. चिकोडीत मात्र भाजपने काँग्रेसकडून सत्ता खेचून आणली आहे. हुक्केरी नगरपंचायतीची सत्ता राखण्यात काँग्रेसला यश मिळाले. तर, संकेश्‍वर नगरपालिकेवर काँग्रेस आणि भाजपला समसमान जागा मिळाल्या. खानापूर नगरपंचायत पक्षचिन्हावर लढली गेली नाही. त्यामुळे खानापुरात अपक्षांनीच बाजी मारली आहे.

गोकाकमध्ये तब्बल 31 पैकी 30 जागा रमेश जारकीहोळी समर्थकांनी जिंकल्या आहेत. तर, रायबाग आणि कुडचीमध्येही काँग्रेसने वर्चस्व राखले. सौंदत्ती, रामदुर्गमध्ये भाजपने बाजी मारली आहे. जिल्ह्यात एकूण 14 नागरी संस्थांच्या निवडणुका झाल्या. त्यात 6 संस्थांवर भाजप तर 5 संस्थांवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. उर्वरित 2 ठिकाणी अपक्षांचा झेंडा आहे, तर संकेश्वर पालिकेत दोन्ही पक्षांना समान 11 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे एक अपक्ष नगरसेवकाचा भाव वधारणार आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या चौदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अपक्षांनी सर्वाधिक 144 जागा मिळविल्या. त्यानंतर भाजप 104 आणि काँग्रेसने 85 अनुक्रमे जागा मिळविल्या. निजदला केवळ दहा जागांवर विजय मिळविता आल्या.

गोकाक नगर पालिकेत एकूण 31 जागांपैकी 30 अपक्ष आणि एक भाजप. निपाणीत एकूण 31 जागांपैकी 18 अपक्ष, भाजपच्या 13 जणांना विजय मिळविता आला. रायबाग नगर पंचायतीतील 19 जागांपैकी काँग्रेसला 11 आणि अपक्षांना 8 जागा मिळाल्या. खानापुरातील 20 पैकी 20 जागांवर अपक्ष, रामदुर्ग नगर परिषदेत 27 पैकी भाजप 16, काँग्रेस 10 आणि 1 अपक्ष. बैलहोंगलमध्ये 27 पैकी भाजप 16, काँग्रेस 10, अपक्ष 3, संकेश्‍वरमध्ये 23 पैकी 11 भाजप , 11 काँग्रेस आणि एक अपक्ष. सौंदत्तीत 27 पैकी 17 भाजप, 9 काँग्रेस आणि 1 अपक्ष. मुडलगीतील 23 जागांपैकी 11 भाजप, 8 निजद आणि 4 अपक्ष, चिकोडीत 23 पैकी 23 जागांवर अपक्ष, कुडचीत 23 पैकी 14 जागांवर काँग्रेस, 8 भाजप आणि अपक्ष उमेदवार निवडून आला. हुक्केरीत 23 पैकी 12 काँग्रेस, 8 भाजप आणि 3 अपक्ष. सदलग्यात 23 पैकी 13 भाजप, 2 निजद आणि 8 अपक्ष. कोन्नूर येथे 23 पैकी 23 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले.