Mon, Apr 22, 2019 15:41होमपेज › Belgaon › जनताच काँग्रेसला सत्तेवरून हद्दपार करेल

जनताच काँग्रेसला सत्तेवरून हद्दपार करेल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

अथणी : विशेष प्रतिनिधी

काँग्रेसच्या राज्यात रेशनचे धान्य काळ्या बाजारात विकले जात आहे. गोदामातील धान्य सडून जात असून काँग्रेसने गरिबांच्या पोटावर पाय देण्याचे काम केले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत जनताच काँग्रेस सरकारची सत्तेवरून हकालपट्टी करून भाजप सरकार सत्तारूढ करेल, असा विश्‍वास प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांनी व्यक्त केला.

येथे कर्नाटक नवनिर्माण परिवर्तन यात्रा कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री अनंतकुमार, रमेश जिगजिनगी, खा. संगाप्पा करडी, आ. महांतेश कवटगीमठ, आ. संजय पाटील, आ. राजू कागे, आ. शशिकला जोल्‍ले, अरविंद लिंबावळी, चिकोडी जिल्हा भाजप अध्यक्ष शशिकांत नाईक होते.

येडियुराप्पा म्हणाले, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाप्रमाणे राज्यात 150 जागा भाजपने जिंकल्याच पाहिजेत. बेळगाव जिल्ह्यात 18 पैकी 16 जागा ताब्यात घ्यायला हव्यात. यासाठी सर्वांनी कामास लागावे. राज्यातील सरकार शेतकर्‍यांची चेष्टा करीत आहे. धारवाड येथील योगेशगौडा खून प्रकरणी व डीवायएसपी गणपती हत्याप्रकरणी संबंधित मंत्र्यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी .

आ. लक्ष्मण सवदी यांच्या प्रयत्नाने एक कोटी 80 हजार एकर जमीन ओलिताखाली आली आहे. ते मंत्री असताना सर्वाधिक अनुदान अथणी तालुक्यास आले आहे. राहिलेली 60 हजार एकर जमिनीस तुंगळ पाणी योजनद्वारे किटलगीपर्यंत  नेण्यास केंद्राकडून अनुदान मंजूर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.मंत्री अनंतकुमार म्हणाले, अथणीच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्राकडून अनुदान कमी पडू देणार नाही. प्रास्ताविक आ. सवदी यांनी केले. चौथ्यावेळीही जनतेचा मला आशीर्वाद मिळणार याची पूर्ण खात्री आहे.खा. प्रभाकर कोरे, आ. दुर्योधन ऐहोळे, वामनाचार्य, अनिल शहापूरकर, इराण्णा कडाडी, रमेश कत्ती, महादेव यादवाड, पराप्पा सवदी, चिदानंद सवदी, दिलीप लोणारी, प्रकाश बजंत्री, विनायक बागडी उपस्थित होते.

40 हजार जनसमुदाय

सकाळी 11 पासून 4 वाजेपर्यंत ट्रॅफिक जाम, 15 हजार मोटारसायकलसमोर ऐगळी क्रॉस येथून नवचैतन्य यात्रा, 5 हजार महिलांचा कुंभमेळा यामुळे हा मेळावा ऐतिहास ठरला.