Mon, Apr 22, 2019 06:14होमपेज › Belgaon › भाजपाध्यक्ष शहा भडकतात तेव्हा...

भाजपाध्यक्ष शहा भडकतात तेव्हा...

Published On: Apr 21 2018 8:17AM | Last Updated: Apr 21 2018 8:17AMबंगळूर : प्रतिनिधी

भाजपच्या अंतर्गत जिल्हावार गटानी येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमताचा 113 हा आकडा मिळविण्यामध्ये अपयश आल्याचा अहवाल दिल्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा भडकले आहेत.

अमित शहा यांनी प्रादेशिक व उपप्रादेशिक पातळीवर निवडणुकीचे काम करणार्‍यांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी जादा कष्ट करण्यास बजाविले आहे. भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी केवळ 15 जागांची कमतरता भासत आहे. बहुमत मिळविण्यासाठी राज्यातील एकूण 224 पैकी 113 जागा जिंकणे आवश्यक आहे. शहा यांच्या सूचनांनुसार निवडणुकीसाठी काम करणार्‍या खास गटांनी राज्यातील मतदान केंद्रानुसार कार्य करावयाचे आहे.

मतदान केंद्रांची वर्गवारी विधानसभा मतदार संघानुसार ए व बी अशी करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रानुसार 30 ते 40 टक्के मतदान हे भाजपच्या बाजूने होण्यासाठी त्या गटाने कार्य करण्याची गरज आहे. सदर गटानी मतदान केंद्रानुसार जादा कष्ट करण्याची गरज आहे. तरच भाजपचे बहुमत वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Tags : BJP, Karnataka, Election, Amit Shah