Wed, Sep 26, 2018 08:12होमपेज › Belgaon › चिक्‍कमंगळूर येथे भाजपच्या जिल्हा सरचिटणीसांची हत्या

चिक्‍कमंगळूर येथे भाजपच्या जिल्हा सरचिटणीसांची हत्या

Published On: Jun 24 2018 1:32AM | Last Updated: Jun 24 2018 12:00AMबंगळूर : प्रतिनिधी

चिक्‍कमंगळूर जिल्हा भाजप सरचिटणीसाची शस्त्रांचे वार करून शनिवारी हत्या करण्यात आली. अन्वर (वय 46) असे मृताचे नाव असून घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी हे कृत्य केले.

पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्‍त केला आहे. कुटुंबीयांनी वैयक्‍तिक वैरत्वातून सुपारी किलरकडून खून करण्यात आल्याचा आरोप केला आहे. आठ वर्षांपूर्वी भाजप मागासवर्गीय मोर्चाच्या अध्यक्षाची याचप्रकारे हत्या करण्यात आल्याची आठवण त्यांनी करून दिली.

चिक्‍कमंगळूर जिल्हा सरचिटणीस सी.टी.रवी आणि खासदार शोभा करंदलाजे यांनी खुनाबद्दल चिंता व्यक्त केली असून, मारेकर्‍यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. खासदार करंदलाजे यांनी अन्वरच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. अन्वर यांची हत्या राजकीय द्वेष की वैयक्‍तिक द्वेषातून झाली हा मुद्दा गौण आहे. त्यांच्या बंधूंनी चौघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पण, पोलिस तपासातून सत्य उघडकीस येण्याची गरज करंदलाजे यांनी व्यक्‍त केली. गुन्हेगारांना कोणतीच भीती राहिलेली नाही.