Wed, Mar 20, 2019 23:38होमपेज › Belgaon › सिद्धरामय्या यांच्या राजवटीत गुन्हे वाढले

सिद्धरामय्या यांच्या राजवटीत गुन्हे वाढले

Published On: Dec 19 2017 1:56AM | Last Updated: Dec 19 2017 1:17AM

बुकमार्क करा

बंगळूर : प्रतिनिधी

सिद्धरामय्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस राजवटीमध्ये बंगळूर शहरासह राज्यामध्ये गुन्हेगारीचा तक्ता वाढतच चालला आहे. बंगळूर आयटी सिटीचे आता ‘रेपसिटी’ झाल्याची गंभीर टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांनी केली आहे. 

सिद्धरामय्या सरकारने येत्या विधानसभा निवडणुुकीवर डोळा ठेवून प्रसिद्धीसाठी 600 कोटी रुपयांचा चुराडा केला आहे. याप्रकारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या जनतेच्या पैशाची विल्हेवाट लावीत आहेत.

लोकप्रतिनिधींनी राज्यातील महत्त्वाच्या विकास योजना राबविण्याऐवजी आपल्या मतदार संघातील विकासकामांकडे लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील अनेक प्रमुख विकास योजना रेंगाळत पडल्या आहेत. परंतु त्याकडे सिद्धरामय्या सरकारचे लक्ष गेलेले नाही. त्यांच्या सरकारच्या कारकिर्दीत अनेक हिंदू कार्यकर्त्यांची हत्या झालेली आहे. त्यामुळे सिद्धरामय्या सरकार हिंदुविरोधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुन्हेगारांवर सरकारचे नियंत्रण नसल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे गुन्हेगारीचा तक्ता राज्यात वाढतच चालला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुढे आलेला आहे. गुन्हेगारांचा शोध लावण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचेच काम सरकार करीत असल्याचा आरोपही येडियुराप्पा यांनी केला आहे.