Tue, Jun 18, 2019 20:26होमपेज › Belgaon › पंतप्रधानांनी केलेले आरोप खरेच : येडि

पंतप्रधानांनी केलेले आरोप खरेच : येडि

Published On: Mar 20 2018 1:47AM | Last Updated: Mar 20 2018 12:21AMबंगळूर : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिद्धरामय्या सरकारवर केलेला 10 टक्क्यांचे सरकार हा आरोप खराच असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते वीरप्पा मोईली यांच्या ट्विटर खात्यावर काँग्रेस पक्ष कंत्राटदारांच्या ताब्यात गेल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र त्यावरून वादंग माजताच हा ट्विट काढून टाकण्यात आला. तसेच आपले ट्विटर खाते हॅक झाल्याचा दावाही मोईलींनी केला होता. मात्र तो खरा मानण्यास भाजप तयार नाही. 

पत्रकारांशी बोलताना येडियुराप्पा म्हणाले,  मोईलींनी केलेला आरोप खराच आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी कर्नाटक दौर्‍यात हाच आरोप केला होता. सिद्धरामय्या सरकार की सीधा रुपय्या सरकार अशीही टीका त्यांनी केली होती. पण त्यावर सिद्धरामय्यांनी एकाच व्यासपीठावर येण्याचे आव्हान दिले होते. आता त्यांच्याच पक्षातील नेते, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री राहिलेले नेते कंत्राटदारीची कबुली देतात.