Thu, Jul 18, 2019 16:29होमपेज › Belgaon › अनावश्यक खर्च टाळा : मुख्यमंत्री कुमारस्वामी

अनावश्यक खर्च टाळा : मुख्यमंत्री कुमारस्वामी

Published On: Jun 04 2018 1:03AM | Last Updated: Jun 03 2018 11:11PMबंगळूर : प्रतिनिधी

राज्याची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी अनावश्यक खर्च टाळा, असे स्पष्ट आदेश सर्व सरकारी कार्यालयांना मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी दिले आहेत.

 राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक मोहीम हाती घेतली आहे. रविवारी मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत एका निवेदनाद्वारे ही माहिती देण्यात आली.

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयामधील अधिकार्‍यांना अनावश्यक खर्च टाळण्याबाबत काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या  कडक सूचना देण्यात आल्या आहेत. याचबरोबर सर्व सरकारी कार्यालये, आस्थापना, विविध विभाग आणि एजन्सीकडून नवीन गाड्या खरेदी करण्यासाठी आलेल्या सर्व प्रस्तावांची पडताळणी करण्यासही मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सांगितले असल्याचेही या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे.