Tue, Apr 23, 2019 10:20होमपेज › Belgaon › आंबा महोत्सवात सेंद्रीय आंब्याचे औत्सुक्य

आंबा महोत्सवात सेंद्रीय आंब्याचे औत्सुक्य

Published On: May 25 2018 1:08AM | Last Updated: May 24 2018 10:37PMबेळगाव : प्रतिनिधी

हापुस, पायरी, तोतापुरी यासारख्या परिचयाच्या व खाण्यात समाविष्ट असणार्‍या आंब्यांच्या जातींसोबत, केसर, रसपुरी (पायरी), मलगोबा, सिदरसा, मालविका व समालिया यासारख्या आंब्यांनी पाहणार्‍यांना खिळवून ठेवले.  बेळगावात काही दिवसांपासून क्‍लब रोडवरील ह्यूम पार्क येथे भरविण्यात आलेल्या आंबा महोत्सवाला असंख्य आंबाप्रेमींनी भेट दिली. बाजारात सर्वत्र आंबा भरपूर प्रमाणात उपलब्ध असला तरी येथे काय खास आहे या उत्सुकतेपोटी अनेक जन भेट देत आहेत. सेंद्रिय आंबा तोही विविध आकारात व रंगात उपलब्ध आहे. आंबा महोत्सवात या जाती मांडण्यात आल्या होत्या. 15 हून अधिक स्टॉल्समधून विविध आंब्यांनी मोहिनी घातली.   विविध जातींच्या आंब्याचे सेेंद्रिय रूपही येथे उपलब्ध असल्याने ते जाणून घेणार्‍यांची संख्या त्या स्टॉलवर दिसून आली. 

काय आहे सेंद्रिय आंबा? 

अन्‍नधान्य, भाज्या तसेच फळफळावळांचा दर्जा उच्च कोटीचा असावा, यासाठी रासायनिक औषधे वा खतांचा वापर न करता, जमिनीची सुपीकता, पोत सुधारण्यासाठीची किमया ज्या शेती संकल्पनेतून पुढे आली ती म्हणजेच सेंद्रिय शेती. भारतात सेंद्रीय शेती प्राचीन काळापासून प्रचलित आहे. मशागत व पिके घेण्याच्या भारतीय पध्दतीत, सेंद्रीय खते (शेणखत, पालापाचोळा व टाकावू पदार्थ सडवून तयार केलेली खते) वापरली जातात. पारंपरिक शेती करण्याच्या सर्व चांगल्या पध्दतींचा अभ्यास करून त्यातील अनावश्यक बाबींना बगल देताना, जमिनीचा पोत राखणे, अधिक शेतमाल उत्पादनक्षमता, कमी वेळ यांची सांगड घालून  शेती करण्यात येते. पर्यावरणाचा समतोल राखण्यास पोषक अशी ही शेती पध्दती पूर्वापार प्रचलित आहे.  आंब्याचे उत्पादन वर्षातून किमान दोनदा शक्य आहे का, यावर संशोधन सुरु आहे. अन्‍नधान्य, गळित धान्ये व काही फळे यांचे उत्पादन वर्षातून दोनदा घेणे शक्य झाले आहे. परंतु आंबा हा खास मोसमातच व वर्षातून एकदा घेतले जाणारे फळ आहे. कारण यासाठी आवश्यक असते विशिष्ट वातावरण.  पावसाळ्यात आंब्याचे उत्पादन शक्य नसल्याने, त्यासाठी खास ग्रीन हाऊस तयार करावी लागतात. ते खर्चिक आहे.