Sun, Mar 24, 2019 22:57
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › एकीसाठी बैठकीचे पवारांचे आश्‍वासन

एकीसाठी बैठकीचे पवारांचे आश्‍वासन

Published On: Mar 25 2018 1:46AM | Last Updated: Mar 25 2018 1:02AMबेळगाव : प्रतिनिधी

मराठी नेत्यांमध्ये एकी घडवून आणण्यासाठी दोन्ही गटातील नेत्यांना एकत्र बोलावून बैठक घेण्याची ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मराठी कार्यकर्त्यांना दिली आहे. 

बेळगावातील काही मराठी कार्यकर्त्यांनी मराठी नेत्यांची एकी घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचच एक भाग म्हणून शुक्रवारी या कार्यकर्त्यांनी मुंबईत पवार यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना एकीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. तशा आशयाचे निवेदन त्यांना देण्यात आले. येत्या 31 मार्च रोजी पवार यांची बेळगावात सभा होणार असून एक सीमावासी, लाख सीमावासी असे सभेला स्वरुप देण्यात आले आहे. 

दोन्ही गटातील नेत्यांना एकत्र आणून सुवर्णमध्य साधावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पवार यांनी दोन्ही गटातील नेत्यांना एकत्र आणण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आणि एकीसंदर्भात जे कार्य सुरु आहे ते योग्यअसून प्रयत्न सुरु ठेवण्याची सूचना केली. लवकरच ठोस भूमिका घेऊ असेही त्यांनी  कार्यकर्त्यांना सांगितले. भेटीवेळी मदन बामणे, सुनील बाळेकुंद्री, पियुष हावळ, रवी निर्मळकर, सुरज कणबरकर आदी उपस्थित होते. 

 

Tags : belgaon, belgaon news, Sharad Pawar, Marathi leaders, amalgamation