Thu, Nov 15, 2018 03:23होमपेज › Belgaon › मनपा ठेकेदाराकडून नगरसेवकावर हल्‍ला

मनपा ठेकेदाराकडून नगरसेवकावर हल्‍ला

Published On: Mar 07 2018 12:41AM | Last Updated: Mar 07 2018 12:40AMबेळगाव : प्रतिनिधी

नगरसेवक सतीश देवरपाटील यांच्यावर महापालिकेच्या कंत्राटदाराने हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली. तशी तक्रार खडेबाजार पोलिसांत करण्यात आली आहे.मनपाच्या कोनवाळ गल्‍ली येथील विभागीय कार्यालयात सदर प्रकार घडला. विकासकामावरून झालेल्या बाचाबाचीत ठेकेदार डी. एस. कुलकर्णी यांनी पाटील यांचा शर्ट फाडला. नगरसेवक पाटील यांच्या वॉर्ड क्र. 39  मध्ये शंभर कोटी अनुदानातून विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्यांची चौकशी करण्यासाठी ते कोनवाळ गल्‍ली कार्यालयातील सहायक अभियंता एम.व्ही.हिरेमठ यांच्याकडे चौकशी करत होते. चर्चा सुरू असतानाच शंभर कोटी अनुदान खर्चाचा अधिकार आमदारांना आहे, त्याच्याशी नगरसेवकांचा काहीच संबंध नाही, असा दावा ठेकेदार कुलकर्णी यांनी केला.  यावरून वाद चिघळल्याने कुलकर्णी यांनी नगरसेवक सतीश देवरपाटील यांच्यावर हल्‍ला केला. या घटनेत सतीश देवरपाटील यांचा शर्ट फाटला. 

त्यानंतर पाटील यांनी खडेबाजार पोलिसांत तक्रार केली. दरम्यान, त्यानंतर कुलकर्णी कार्यालयातून बाहेर पडले. घटनेची माहिती मिळताच महापौर बसवराज चिक्‍कलदीनी यांनी कोनवाळ गल्‍ली कार्यालयाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे. अशाप्रकारे नगरसेवकावर हल्‍ला करण्याची ही पहिलीच घटना 
आहे.