Tue, Oct 22, 2019 02:34होमपेज › Belgaon › निवडणुकीच्या तोंडावर उ. कर्नाटकासाठी २,४६८ कोटींची योजना : येडिंची टीका

निवडणुकीच्या तोंडावर उ. कर्नाटकासाठी २,४६८ कोटींची योजना : येडिंची टीका

Published On: Dec 05 2017 1:48AM | Last Updated: Dec 04 2017 10:49PM

बुकमार्क करा

गुलबर्गा : प्रतिनिधी

येत्या विधानसभेची निवडणूक केवळ तीन महिन्यांच्या तोंडावर असताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी 2,468 कोटी रु.च्या 519 विकास योजना सुरू करणे म्हणजे मतदारांवर प्रभाव पाडविण्याचा प्रकार असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांनी पत्रकाराशी बोलताना केली आहे.

परिवर्तन यात्रेवेळी बोलताना येडियुराप्पा म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर याप्रकारे विकास योजना सुरू करून मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे अधिकाराचा दुरुपयोग करीत आहेत. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत राज्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची बनली आहे. सरकारकडे दूध उत्पादकांना प्रोत्साहन धन देण्यासाठी व लोकप्रतिनिधींचे वेतन देण्यासाठीसुद्धा पैसा नाही सरकारने बंगळूरमधील कॉर्नर प्लॉट्स कराराने देऊन 970 कोटी रु. चे कर्ज घेतले आहे.

त्याशिवाय राष्ट्रीयकृत बँकांकडून 1400 कोटी रु. चे कर्ज घेतले आहे. विविध आर्थिक संस्थाकडून सरकारने 1.75 लाख कोटी रु. चे कर्ज घेतलेले आहे. परंतु, राज्याची आर्थिक परिस्थिती सरकारला सुधारता आलेली नसल्याची टीका येडियुराप्पांनी केली आहे. 
WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DEeePAgbWU94pj0zgYWo19