Tue, Nov 20, 2018 23:08होमपेज › Belgaon › कर्नाटक : निवडणूक घोषणा एप्रिलच्या प्रारंभी? 

कर्नाटक : निवडणूक घोषणा एप्रिलच्या प्रारंभी? 

Published On: Mar 25 2018 1:46AM | Last Updated: Mar 25 2018 1:46AMबंगळूर : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीची घोषणा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 23 मार्च रोजी निवडणुकीची घोषणा करण्यात येणार असल्याचे वृत्त होते. मात्र, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वेळापत्रक जाहीर करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चालू महिन्याच्या 27 व 28 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी उमेश सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील पथक निवडणूक पूर्वतयारीची पाहणी करण्यासाठी बंगळूरला येत आहे. पथक गेल्या निवडणुकीप्रमाणे येत्या निवडणुकीसाठीही जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख यांसह राज्य सरकारी वरिष्ठ अधिकार्‍यांशी निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा करेल. त्यासंबंधीचा अहवाल दिल्ली येथे मुख्य निवडणूक अधिकार्‍यांना सादर केल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात  निवडणूक पूर्वतयारीची पाहणी करतील.

 

Tags : Karnataka Assembly Election, announced, April,