होमपेज › Belgaon › विवाह सोहळ्यांवरही करडी नजर 

विवाह सोहळ्यांवरही करडी नजर 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक जारी झालेली आचारसंहिता याचा परिणाम एप्रिल व मे महिन्यात होणार्‍या विवाह सोहळ्यांसारख्या सार्वजनिक कार्यक्रमांवर होणार आहे. आचारसंहितेचे  पालन  करण्याची अट वर?वधू पक्षांबरोबरच  विवाह सोहळ्यासाठी येणार्‍या नातेवाईक, पै? पाहुणे, सोहळ्यासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचार्‍यांवर आली आहे. आचारसहिंतेचे उल्लंघन होईल, अशा पध्दतीने कार्यक्रम  झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार आहे. त्यामुळे धुमधडाक्यात सोहळा साजरा करण्याच्या विचारात असलेल्या मंडळींचा हिरमोड झाला आहे.

निवडणुकीची आचारसंहिता 27 मार्चरोजी जारी झाली. 15 मेरोजी निवडणूक निकाल  जाहीर  झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येणार आहे. आचारसंहितेच्या  45 दिवसांच्या काळात विवाह मुहूर्त अनेक आहेत. 1 एप्रिल  ते 12 पर्यंत  18 मुहूर्त असून 25 एप्रिल ते 12 मे पर्यंत विवाहासाठी 8 उत्तम मुहूर्त आहेत.  विवाह सोहळ्यासाठी येणार्‍यांची अधिक बडदास्त ठेवणे, भेटवस्तू देणे, त्यांना गावी पोहोचविणे यासारखे प्रकार किंवा सोहळ्यासाठी येणारा अतिरिक्‍त खर्च वर? वधू पक्षातील प्रमुखांऐवजी निवडणूक लढवणार्‍या उमेदवाराने करणे यासारखेे प्रकार गेल्या निवणुकीदरम्यानच्या विवाह सोहळ्यातून घडले होते.

हवी लेखी माहिती

आता निवडणूक आचारसंहिता जारी होण्यापूर्वी नोंदणी झालेले विवाह सोहळेे व त्यानंतर नोंदणी झालेल्या विवाह सोहळ्यांसंबंधीची संपूर्ण माहिती लेखी स्वरुपात देण्याची सूचना वधू? वर पक्षातील प्रमुखांना निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. विवाह सोहळ्याचे आयोजन केलेल्या  वधू?वर पक्षातील प्रमुखांनी आपल्या तालुक्यातील निवडणूक अधिकार्‍यांकडे लेखी माहिती देणे बंधनकारक आहे.   

ग्रामीण भागात होणार्‍या विवाह सोहळ्यांना किमान हजार नागरिक उपस्थित असतात. यामध्ये एखाद्या उमेदवाराने आपला प्रचार करण्यासाठी  विवाह सोहळ्याचा वापर करण्याची शक्यता अधिक असते. 

उमेदवार अथवा त्याच्या समर्थकांनी मतांची मागणी करणे, राजकीयप्रेरित भाषण केल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आल्यास संबंधित उमेदवार व विवाह सोहळा आयोजकांवर (वर? वधु) गुन्हा दाखल होणार आहे.


  •