Tue, Apr 23, 2019 06:13होमपेज › Belgaon › कर्नाटक विधानसभा निवडणूक ६ महिने लांबणीवर? 

कर्नाटक विधानसभा निवडणूक ६ महिने लांबणीवर? 

Published On: Mar 04 2018 1:45AM | Last Updated: Mar 04 2018 1:45AMबंगळूर :

राज्यात येत्या मे महिन्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रीय नेत्यांचे दौरे, जाहीर सभा, उमेदवार निश्‍चिती यांना जोर आलेला असतानाच निवडणूक सहा महिने लांबणीवर पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळामधून वर्तवली जात आहे. त्यामुळे अनेक नेते, कार्यकर्त्यांत अस्वस्थता पसरली आहे. पुढील वर्षी म्हणजे 2019 मध्ये लोकसभा निवडणूक होणार असल्याने कर्नाटकातील निवडणूक लोकसभा निवडणुकीबरोबर घेऊन वेळ आणि पैशाची बचत करण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असल्याचे  समजते. त्यामुळे राज्याची निवडणूक पुढील वर्षाच्या नोव्हेंबर?डिसेंबरमध्ये होऊ शकेल, असे काही राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

मात्र, या अंदाजाला राज्यातील भाजप नेत्यांनी  दुजोरा दिलेला नाही. दरम्यान,  निवडणूक लांबणीवर टाकल्यास  सिद्धरामय्या यांना आयती संधी भाजपने मिळवून दिल्याचे होणार आहे, असे भाजप नेत्यांची मते आहेत.

पराभवाची भीती : जॉर्ज    

या निवडणुकीत भाजप पराभूत होईल, अशी चिंता या  ज्येष्ठ  नेतेमंडळींना लागल्याने निवडणूक लांबणीवर टाकून जनतेच्या मनावर भाजपचे कार्य बिंबविण्यासाठीची धडपड भाजपने चालविली आहे, अशी टीका के.जे.जॉर्ज यांनी केली.