Tue, Jul 07, 2020 11:34होमपेज › Belgaon › भाजपकडून लखन जारकीहोळी ?

भाजपकडून लखन जारकीहोळी ?

Published On: Dec 29 2017 1:35AM | Last Updated: Dec 28 2017 8:43PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांकडून गुप्तपणे सर्व्हे करण्यात आला असून याबाबतचा अहवाल पक्षाच्या नेत्यांकडे देण्यात आला आहे. काँग्रेसचे आमदार सतीश जारकीहोळी यांच्या यमकनमर्डी मतदारसंघातून भाजपने यावेळी खडतर आवाहन उभे करण्याचा निर्णय घेतला असून यात सतीश जारकीहोळींचे बंधू लखन जारकीहोळी यांच्या नावाला दुजोरा मिळाला असून या मतदारसंघात अतितटीची लढत होणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. 

विधासभा निवडणुकीची लगबग आतापासूनच सुरु झाली असून राजकीय पक्षांनी आगामी निडवणुका दृष्टीक्षेपात ठेवून तयारी चालविली आहे. काँग्रेस व भाजप या कट्टर प्रतिस्पर्धी पक्षांनी आपली शक्‍ती पणाला लावली आहे. भाजपकडून मतदारसंघानुसार गुप्त सर्व्हे करण्यात आला असून विद्यमान आमदार व निवडणुकीच्या रेसमध्ये असणार्‍या उमेदवारांबद्दलच्या प्रतिक्रिया नागरिकांतून घेण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील अहवाल नुकताच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठविण्यात आला आहे. 

नुकताच यासंदर्भात बंगळूर येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या बैठकीत सदर अहवाल सादर करण्यात आला आहे. भाजप शहरी भागात कमकुवत ठरत असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. यासाठी पक्ष अधिक बळकट करून सेटलमेंटचे राजकारण करणार्‍या नेत्यांना योग्य धडा शिकविण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. सदर अहवालानुसार यमकनमर्डी मतदार संघात काँग्रेसचे आ. सतीश जारकीहोळी यांचे राजकीय प्राबल्य असल्याने सदर मतदारसंघातील कमकुवत बाजूंचा भाजपने सखोल अभ्यास केला आहे. या मतदारसंघातून भाजपने यावेळी तगडा उमेदवार देण्याचा विचार चालविला असून जारकीहोळी यांचे बंधू लखन जारकीहोळी यांना उमेदवारी देण्याच्या वृत्ताला भाजपच्या कार्यकर्त्यांनीच दुजोरा दिला असल्याने सध्या त्यांचे नाव चर्चेत आहे. 

यापूर्वीही काही भाजप ब्लॉक अध्यक्षांनी विद्यमान भाजप नेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त करत भाजपचे राज्याध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांच्यासह राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मतदारसंघात प्रतिस्पर्धी उमेदवाराला आव्हान देणारा उमेदवार उभा करावा, अशी मागणीही केली आहे. याचाही विचार करण्यात आला आहे. लखन जारकीहोळी यांनी विविध माध्यमातून मतदारसंघात संपर्क वाढविण्यावर भर दिला आहे.  त्यामुळे त्यांचे नाव सध्या चर्चेत आहे.