Mon, Jul 15, 2019 23:41होमपेज › Belgaon › बेळगावच्या विद्यार्थिनीच्या पत्राला पंतप्रधान मोदींची दाद

बेळगावच्या विद्यार्थिनीच्या पत्राला पंतप्रधान मोदींची दाद

Published On: Mar 03 2018 1:52AM | Last Updated: Mar 02 2018 10:47PMबेळगाव : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लिहिलेल्या ‘एक्झाम वॉरिअर्स’ पुस्तक वाचून विद्यार्थिनीने दिलेल्या अभिप्रायाला मोदी यांनी दाद दिली आहे. अभिप्रायाबद्दल ट्वीट करून अभिनंदन केले आहे. 

ज्ञान प्रबोधन मंदिरमध्ये दहावीत शिकणार्‍या आर्या लोकूर हिने पंतप्रधान मोदीलिखित एक्झाम वॉरिअर्स पुस्तक वाचले. यामुळे तिची परीक्षेविषयीची भीती दूर झाली. तिने मोदी यांना सविस्तर दोन पानी अभिप्राय पाठविला. यामध्ये मोदी यांचे पुस्तक लेखनाबद्दल आभार मानले. याची दखल खुद्द मोदी यांनी घेतली.

तिने पुस्तकातून घेतलेल्या प्रेरणेचा उल्लेख करून मोदी यांनी तिचे कौतुक केले आहे. आपण चालविलेल्या चळवळीला आर्याच्या पत्रामुळे बळ मिळाले आहे. ही पोस्ट 12 हजार जणांनी लाईक केली आहे. 2700 जणांनी रिट्वीट तर 774 जणांनी अभिप्राय लिहिला आहे.

पंतप्रधानांच्या पुस्तक वाचनामुळे आपल्यातील परीक्षेविषयीची भीती दूर झाली आहे. कॉपीसारख्या गैरप्रकारांना बळी पडणे योग्य नव्हे. परीक्षेला सामोरे जाताना सेनानी होणे आवश्यक आहे. कोणत्याही काळजीने ग्रासून जाण्याची गरज नाही. ही शिकवण मोदी यांनी  दिल्याचे आर्याने सांगितले आहे.