Thu, Apr 25, 2019 22:00होमपेज › Belgaon › बेळगावच्या मूर्तिकारांची कला अव्वलच

बेळगावच्या मूर्तिकारांची कला अव्वलच

Published On: Aug 25 2018 1:13AM | Last Updated: Aug 24 2018 11:19PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव शहर मूर्तिकारांची खाण आहे. या भूमीत एकापेक्षा एक अव्वल मूर्तिकार आपली कला गणेशोत्सव काळात दाखवित असतात. केवळ बेळगावात नाही तर परराज्यातदेखील  त्यांनी बनविलेल्या मूर्तीना मागणी आहे. ‘पीओपी की शाडू’ या संभ्रमात येथील मूर्तिकार असले तरी मूर्ती बनविण्याच्या कलेवर परिणाम होऊ दिला नाही. यंदा विविध देवदेवतांच्या अवतारात गणेशमूर्ती बनविण्यात आल्या आहेत.

बेळगावात कै. जे. जे. पाटील यांनी मूर्तीकलेत बेळगावची कीर्ती दूरवर पसरवली. त्यांची दोन्ही मुले मूर्तीकलेत तरबेज आहेत. यंदा कृष्ण, राम, विठ्ठल, शंकर, विष्णू, शंकर-पार्वती-गणेश, सिंहावर आरुढ, मूषकारूढ, हंस, बदक व मोरावर आरुढ, गोहत्या बंदीवर आधारित देखावा, घंटेवर विराजमान गणेश, तुतारीवर नृत्य करणारा गणेश, छत्री घेऊन जाणार गणेश या अवतारातील मूर्तींना मागणी आहे. बेळगावातील गणेशमूर्ती गोवा, मध्य प्रदेश, हुबळी, बंगळूरला जातात. 

या बरोबर मूर्तिकार विक्रम पाटील (अनगोळ), संजय किल्लेकर, अशोक जाधव (बापट गल्ली),  विजय सीमू (अनगोळ), मनोहर पाटील (भांदूर गल्ली), मारुती कुंभार (कपिलेश्वर)संजय म्हस्के (चिदंबरनगर), एम. जी. पाटील ( मुतगा), विद्याधर लोहार (मंडोळी), सिद्राय लोहार (केदनूर) यांनी नावलौकिक मिळवला आहे.

खालील भागात आहेत मूर्तिकार

बेळगाव शहर 

बापट गल्ली, बकरी मंडई, भांदूर गल्ली, शनिवार खुट, भडकल गल्ली, खडक गल्ली, चव्हाट गल्ली, तहसीलदार गल्ली, कपिलेश्वर मंदिर, शामाप्रसाद मुखर्जी रोड. अनगोळ, वडगाव, शहापूर, गांधीनगर, मारुतीनगर, नाथ पै सर्कल

ग्रामीण भाग :  मंडोळी, वडगाव, मुतगा, केदनूर, येळ्ळूर, हिंडलगा, सुळगा. खानापूर : खानापूर शहर, गर्लगुंजी, तोपिनकट्टी, डुक्करवाडी, निट्टूरवाडा, विश्रांतवाडी, लालवाडी, नंदगड, हलशी, घोटगाळी, रामगुरवाडी, जांबोटी, लोंढा.