Sun, Jun 16, 2019 12:35
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › गोवा बिल्डर अपहरण प्रकरणी चौघे गजाआड

गोवा बिल्डर अपहरण प्रकरणी चौघे गजाआड

Published On: Mar 06 2018 12:08AM | Last Updated: Mar 05 2018 11:50PMनिपाणी : प्रतिनिधी

गोवा म्हापसा येथील बिल्डर तारक आरोलकर यांचे अपहरण करून फरारी असणार्‍या आंतरराज्य टोळीतील चौघांना निपाणी पोलिसांनी गजाआड केले. रियाज गुंदगी (वय 40), दस्तगीर खानापुरे (वय 30, रा. दोघेही विजापूर, सध्या रा. सोलापूर) व मेहबुब नजीर मकानदार (वय 28), इलियास कोकटनूर (वय 26, रा. अथणी) अशी अटक केलेल्यांंची नावे आहेत. त्यांच्याकडून 2 लाख रुपयांची रोकड, पिस्तूल व कार असा मुद्देमाल जप्त केला आहे. तब्बल सात महिन्यांनंतर ही कारवाई झाली.

बिल्डर तारक आरोलकर हे सप्टेंबर 2017 मध्ये महाबळेश्‍वर येथे शिकत असलेल्या आपल्या मुलाला भेटण्यासाठी गेले होते. 16 सप्टेंबरला गावी परत येत असताना विजापुरातील एकाने 
भेटण्याचे कारण सांगून त्यांना कोगनोळी टोलनाक्यावर थांबण्यास सांगितले होते. मात्र तेथे आठ ते दहा जणांच्या टोळीने आरोलकर 
यांच्याकडील 2.50 लाख रुपये पिस्तूल, कार असा ऐवज लुटून त्यांना सांगली येथे चार दिवस डांबून ठेवले. शिवाय आरोलकर यांच्या गोवा कार्यालयातील 3 लाख रुपये रक्‍कमही लूट केली.
लुटारूंनी शिर्डीला गेलेल्या आरोलकरच्य भावाला सातार्‍यानजीक गाठून त्यालाही लुटले.