Tue, Feb 19, 2019 10:31होमपेज › Belgaon › नगरसेवकांना वेध सिमला दौर्‍याचे

नगरसेवकांना वेध सिमला दौर्‍याचे

Published On: Sep 06 2018 1:40AM | Last Updated: Sep 05 2018 11:33PMबेळगाव : प्रतिनिधी

महापालिकेचा कार्यकाल संपत आल्याने सिमला टूरला जाण्यासाठी नगरसेवक तयारी करत आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत सिमला टूरला जाण्यासाठी एकमुखी ठराव मंजूर झाला होता. महापौर बसप्पा चिकलदिन्नी यांनी सिमला टूरला जाण्याचे जाहीर केले होते. 

गेल्या महिन्यात सिमल्याहून एक पथक बेळगाव महापालिकेला भेट देऊन गेले. बेळगाव महापालिकेने  दहा वॉर्डात 24 तास पाणी योजना राबविली आहे. याची त्यांनी पाहणी करून कौतुक केले होते. सिमल्याच्या महापौरांनी बेळगावचे महापौर, उपमहापौर तसेच सर्व नगरसेवकांना सिमल्याला येण्याचे आमंत्रण दिले आहे. तेव्हापासून सर्वांना सिमला टूरचे वेध लागले आहेत.  गेल्या महिन्यात झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत सिमला टूरचा विषय महापौरांनी दोन वेळा बैठकीत उचलून धरला. दुपारच्या विश्रांतीनंतर सिमला टूरवर शिक्कामोर्बत झाले. याला नगरसेवका सरला हेरेकर यांनी विरोध केला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सर्वांच्या समंतीने एकमुखी ठराव बैठकीत संमत करण्यात आला. जानेवारीला सिमला टूरचे आयोजन असले तरी आतापासूनच नगरसेवकांनी  सिमला टूर जाणार असल्यास माहिती देणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे सिमला टूरचे आयोजन करण्यात येणार आहे. आता कार्यकाळ संपत आला आहे. तो संपायच्या आत सिमला टूर उरकून घेऊया, असा सूर ऐकायला मिळत आहे.