Sun, Jun 16, 2019 02:12होमपेज › Belgaon › फिरोज सेठ ‘बुडा’चा पदभार आज स्वीकारणार 

फिरोज सेठ ‘बुडा’चा पदभार आज स्वीकारणार 

Published On: Feb 19 2018 1:24AM | Last Updated: Feb 18 2018 11:42PMबेळगाव : प्रतिनिधी 

बेळगाव उत्तरचे आमदार फिरोज सेठ यांची राज्य सरकारने बेळगाव नगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली असून ते सोमवार, दि. 19 रोजी कार्यभार स्वीकारणार आहेत. 

गेल्या दीड वर्षापासून बुडा अर्थात बेळगाव नगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद रिक्त होते. हे पद मिळविण्यासाठी काँग्रेसमध्ये चढाओढ होती. त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींपुढे कोणाला पद द्यावे, हा प्रश्‍न निर्माण झाला होता. मात्र, यावर तोडगा म्हणून मुख्यमंत्री सिद्धरामय्या व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डॉ. जी. परमेश्‍वर यांनी राज्यात पहिल्यांदाच आमदार या नात्याने फिरोज सेठ यांची बुडा अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.