Wed, Mar 27, 2019 00:36होमपेज › Belgaon › आरटीईसाठी अर्ज भरा उद्यापासून

आरटीईसाठी अर्ज भरा उद्यापासून

Published On: Feb 19 2018 1:24AM | Last Updated: Feb 18 2018 10:45PMनिपाणी : प्रतिनिधी

2018-19 या वर्षासाठी विनाअनुदानित खासगी व अनुदानित शाळांमध्येही यंदापासून 25 टक्के   आरक्षण लागू झाले असून,  उद्या मंगळवार दि.20 पासून ऑनलाईन अर्ज भरता येतील.  यावर्षी खासगी व अनुदानित शाळांनाही आरटीई कायद्याखाली आणल्याने विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे.  गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी किमान 15 हजार जागा अधिक उपलब्ध होणार आहेत.

कसा करावा अर्ज?

आरटीईसाठी अर्ज करणारा विद्यार्थी, विद्यार्थ्यांची आई किंवा वडील यांचा आधार क्रमांक सक्तीचा आहे. अटलजी जनस्नेही केंद्र, संगणक अथवा मोबाईलव्दारे ऑनलॉईन अर्ज भरण्याची सुविधा आहे. अर्ज भरताना चूक झाल्यास एसएमसव्दारे माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे मोबाईल क्रमांकही अनिवार्य आहे. ीलहेेश्रशर्वीलरींळेप.ज्ञरी.पळल.ळप या संकेतस्थळावर आपल्या जवळच्या शाळांची यादी उपलब्ध आहे. अर्जभरणाही याच संकेतस्थळावर करण्याचे आहे.

कशी होणार निवड?

लॉटरी प्रक्रियेव्दारे पहिल्या टप्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना े 7 एप्रिल ते 17 एप्रिलपर्यंत शाळांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. 19 एप्रिलपर्यंत प्रवेश घेतलेलया विद्यार्थ्यांची माहिती अपलोड करण्यात येईल. 26 एप्रिल रोजी दुसर्‍या टप्यातील नावे जाहीर करण्यात येणार आहेत. या फेरीतील लाभार्थी, विद्यार्थ्यांना 27 एप्रिल ते 5 मेपर्यंत जागावाटप करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना वयाची अट

आरईटी प्रवेश वगळून उर्वरित 75 टक्के मुलांची माहितीही शिक्षण खात्यास देणे शाळांना बंधनकारक झाले आहे. आरक्षित 25 टक्के जागांमध्ये भ्रष्टाचार होऊ नये यासाठी ही माहिती सक्तीची करण्यात आली आहे. आरटीई नियमावली एलकेजी, युकेजीलाही सक्तीची करण्यात आली आहे. 3 वर्ष 10 महिने व 4 वर्ष 10 महिने पूर्ण असणार्‍या लहान मुलांना एलकेजी व युकेजीला अर्ज करण्याची सोय करण्यात आली आहे. तर पहिलीच्या वर्गापासून शाळा परवाना मिळविलेल्या शाळांना 5 वर्षे 10 महिने ते 6 वर्ष 10 महिन्यातील मुलांना पहिलीला 25 टक्के आरक्षण द्यावे लागणार आहे.

मागासवर्गीयांचा विचार

14 मे ला तिसर्‍या टप्यातील नावे तर 16 ते 22 मे पर्यंत जागावाटप करण्यात येणार आहेत. मे 30 पर्यंत प्रवेशाची मुदत असेल. मध्यम व मागावर्गीय विद्यार्थ्यांच्या हितासाठी खासगी व अनुदानित शाळामध्ये उपलब्ध असणार्‍या शेकडा 25 टक्के जागा शिल्लक ठेवण्यात आल्या आहेत.

वेळापत्रक असे

20 फेब्रुवारी ते 21 मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. 23 ते 27 मार्चपर्यंत अर्ज छाननी प्रक्रिया पार पडणार आहे. 2 एप्रिलरोजी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे ऑनलाईन उपलब्ध होतील.