Thu, Jul 18, 2019 05:06होमपेज › Belgaon › मतदारांना विकत घेण्याचा डाव हाणून पाडा

मतदारांना विकत घेण्याचा डाव हाणून पाडा

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 09 2018 8:40PM
निपाणी : प्रतिनिधी

काँग्रेस पक्ष हा देशातील सर्वसामान्य जनतेला तारणारा पक्ष आहे. पाच वर्षात सिध्दरामय्या सरकारने  विविध योजनांतून भरपूर विकास साधला आहे. जनतेने लाचार न होता विकासासाठी काँग्रेस पक्षाचे काकासाहेब पाटील व गणेश हुुक्केरी यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटी निरिक्षक व आ. सतेज पाटील यांनी केले. भोज येथे काकासाहेब पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खा. प्रकाश हुक्केरी होते.

आ. पाटील पुढे म्हणाले, कर्नाटकात सिध्दरामय्या सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करुन विश्वासास पात्र ठरले आहे. राज्यात पुन्हा काँग्रेस सरकार सत्तेवर येणार आहे. निवडणुकीत धनशक्‍ती मोडून काढून जनशक्‍ती सांभाळणार्‍या  काकासाहेब पाटील यांना निवडून द्यावे.

काकासाहेब पाटील यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी खा. प्रकाश हुक्केरी, वीरकुमार पाटील व  आपण आमदार असताना  कारदगा, खडकोळ, बारवाड, सिदनाळ नदीवर पूल मंजूर केले. जाती भेद, पक्षपात कधीच केला नाही, असे सांगितले.

खा. प्रकाश हुक्केरी, वीरकुुमार पाटील, लक्ष्मणराव चिंगळे यांनीही मनोगत व्यक्‍त केले. सचिन केस्ते यांनी स्वागत तर लक्ष्मण हिंदळकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जि. प. सदस्य राजेंद्र वड्डर, गोपाळदादा पाटील, उत्तम पाटील, आण्णासो हावळे, प्रदीप जाधव, डॉ. बी. ए. माने, श्रेणिक पाटील, बाबू खोत आदी उपस्थित होते.