होमपेज › Belgaon › आणखी १४ युवकांना अटक

आणखी १४ युवकांना अटक

Published On: Dec 22 2017 1:25AM | Last Updated: Dec 22 2017 12:01AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

खडक गल्ली आणि आसपासच्या संवेदनशील परिसरात सोमवारी रात्री झालेल्या दंगलप्रकरणी खडेबाजार पोलिसांनी 13 जणांना तर मार्केट पोलिसांनी एकाला असे एकूण 14 जणांना अटक करण्यात आले आहे. पोलिसांनी सोमवारच्या दंगलप्रकरणी 180 जणांची यादी बनविली आहे. अन्य संशयितांचाही शोध घेतला जात आहे. 

बुधवारी रात्री विशाल जयराम हंगिरगेकर (रा. पांगुळ गल्ली), योगेश गोपाळ हट्टीकर (रा. भातकांडे गल्ली), अजय वामन गायकवाड (रा. खडक गल्ली), प्रशांत बसवंत मोरे (रा. गणाचारी गल्ली), कुलदीप किसान ताशिलदार (रा. माळी गल्ली) व प्रितेश मदन गौंडाडकर (रा. चव्हाट गल्ली) या जणांना केली होती. त्यानंतर गुरुवारी प्रशांत अर्जुन पाटील (रा. रामनगर कंग्राळी खुर्द), मनोज महेश राऊत (रा. बापट गल्ली), संपत यशवंत शिंदे व गणेश सुरेश बिलावर (दोघेही रा. कंग्राळकर), विजय भावकण्णा देमण्णाचे (रा. किल्ला) शिवराज जयंत मोहिते (रा. केळकर बाग) व अभिजित गंगाधर पाटील (रा. शहापूर) या सात जणांना अटक केली. खडेबाजार पोलिसांनी दोन दिवसांत 13 जणांना अटक केली, तर मार्केट पोलिसांनी प्रवीण शंकर जेडण्णावर (रा. भडकल गल्ली) याला अटक केली आहे. 

अटक करण्यात आलेल्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. त्यानंतर विविध परिसरांतील महिलांनी गुरुवारी सायंकाळी खडेबाजार पोलिस ठाण्यासमोर येऊन  उपस्थित महापौर संज्योत बांदेकर यांच्यावरही प्रश्‍नांचा भडीमार केला. राजकीय दबावातून पोलिसांनी रात्रीपासून एकतर्फी कारवाई सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला. एका विशिष्ट समाजाला पोलिसांनी लक्ष्य बनवू नये, योग्य ती माहिती घेऊनच पोलिसांनी कारवाई करावी, असे आवाहनही महापौर बांदेकर यांनी केले. त्यावर वरिष्ठांकडून आलेल्या माहितीनुसारच अटकसत्र सुरू असल्याचे सातेनहळ्ळी यांनी सांगितले.

पोलिसांनी राजकीय दबावाखाली आमच्या मुलांना अटक केली आहे. काही राजकीय नेते समाजकंटकांना पाठीशी घालत आहेत. तर निष्पाप मुलांना पोलिस अटक करीत आहेत. अशा वेळी आमचे नेते काय करीत आहेत, असा सवालही संतप्त महिलांनी महापौर बांदेकर यांना विचारला. माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी उपस्थित महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. महापौर बांदेकर यांनी संतप्त महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.