Mon, Mar 25, 2019 17:40होमपेज › Belgaon › अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन यशस्वी करणार : अ‍ॅड. अशोक पोतदार

अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन यशस्वी करणार : अ‍ॅड. अशोक पोतदार

Published On: Dec 03 2017 1:09AM | Last Updated: Dec 02 2017 11:09PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

शाहीर अण्णा भाऊ साठे संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून योगदान देणे गरजेचे आहे.  अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत फार मोठे योगदान आहे. त्यावेळी त्यांनी एक चळवळ उभी केली होती. शाहिरांविषयी माहिती होण्यासाठी भरविण्यात येत असलेले संमेलन यशस्वी करायचे आहे, यासाठी प्रत्येकाची साथ महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. अशोक पोतदार यांनी केले. 

बेळगावात दि. 16 व 17 डिसेंबरला अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी शनिवारी (दि.2) रामदेव गल्ली, गिरीश कॉम्प्लेक्समधील शहीद भगतसिंग सभागृहात मार्ग संस्थेची बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून अ‍ॅड. पोतदार बोलत होते. 

प्रास्ताविकात कृष्णा शहापूरकर यांनी बैठकीचा उद्देश सांगितला. बैठकीत साहित्य संमेलनाबरोबरच कडोलकर गल्लीतील हुतात्मा चौकात मास्टर प्लॅन झालेले आहे. त्याठिकाणी मार्ग संस्थेच्या वतीने कडोलकर गल्ली, व्यापारी व नागरिकांच्या सहकार्याने सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अ‍ॅड. पोतदार यांचे 75 व्या वर्षात पदार्पण झाल्याच्या निमित्ताने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.  

यावेळी महादेव पाटील, मधू पाटील, चिमन जाधव, गुरुनाथ भादवणकर, अजित हिंडलगेकर, अनंत लाड, नगरसेविका माया कडोलकर, सदानंद सामंत, माजी आ. परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, डी. बी. पाटील, शिवराज पाटील, विकास कलघटगी आदी उपस्थित होते.