Thu, Aug 22, 2019 12:32होमपेज › Belgaon › स्वार्थी राजकारण्यांना धडा शिकवा

स्वार्थी राजकारण्यांना धडा शिकवा

Published On: Jan 15 2018 1:41AM | Last Updated: Jan 15 2018 12:05AM

बुकमार्क करा
अंकली : प्रतिनिधी  

काही स्वार्थी राजकीय नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थापोटी वीरशैव लिंगायत समाजात दुफळी निर्माण करुन समाजाचे विभाजन करु पहात आहेत. अशा स्वार्थी राजकारण्यांना आगामी काळात चांगलाच धडा सर्व समाजबांधवांनी शिकवावा, असे आवाहन श्रीशैलपीठाचे जगद्गुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य स्वामीजी यांनी केले. येडूर वीरभद्र देवाच्या विशाली यात्रेनिमित्त आयोजित पंचक्रोशी पदयात्रेच्या तिसर्‍या दिवशी मांजरी येथील काडसिद्धेश्‍वर मठात आयोजित धर्मसभेत जगद्गुरू स्वामीजी बोलत होते. 

प्रास्ताविक आणि स्वागत येडूरचे मल्लय्याशास्त्री जडे यांनी केले. स्वामीजी पुढे म्हणाले, वीरशैव आणि लिंगायत हे एकच धर्म आहेत. पण काही समाजविधानकांनी समाजाचे संघटन करण्याऐवजी त्याचे विभाजन करू पाहत आहेत. पण केवळ स्वार्थापोटी समाजाचे विभाजन होता कामा नये. त्यासाठी समाजबांधवांनी एकत्रित येऊन स्वार्थी नेत्यांना चांगलाच धडा शिकवावा.  यावेळी मांजिरीच्या काडसिद्धेश्‍वर मठाचे स्वामीजी, गुलबर्गाचे अन्नदानशास्त्री यांनीही समाजाला प्रबोधन केले. यावेळी आंबिकानगरचे ईश्‍वर पंडीताराध्य शिवाचार्य, शहापुरचे सुरनुरेश्‍वर, पं. पू. चन्नरूद्रमणी शिवाचार्य स्वामीजी उपस्थित होते. यावेळी मांजरी येडूर, चंदूर, इंगळी, शिरगुप्पी, जुगुळ येथील भाविक उपस्थित होते.