Sat, Apr 20, 2019 08:50होमपेज › Belgaon › दहावी-बारावी विद्यार्थ्यांना तज्ज्ञांच्या टिप्स

दहावी-बारावी विद्यार्थ्यांना तज्ज्ञांच्या टिप्स

Published On: Feb 28 2018 1:18AM | Last Updated: Feb 27 2018 9:07PMअंकली : प्रतिनिधी

राज्यात बारावी व दहावीच्या परीक्षांना मार्चमध्ये प्रारंभ होणार आहे. या काळात विद्यार्थ्यांनी कोणताही तणाव न घेता परीक्षांना सामोरे जाण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.  दहावी व बारावीच्या परीक्षा महत्त्वपूर्ण असल्याने या काळात तणावामुळे विद्यार्थ्यांना झोप न येणे, भूक न लागणे, चिडचिड, डोकेदुकी, पोटदुखी, नैराश्य, परीक्षेत अभ्यासाचा विसर अशा समस्या दिसून येतात. यावर मात करण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी एकमेकांशी सुसंवाद ठेवणे महत्त्वाचे ठरते. परीक्षा काळात विद्यार्थ्याला गरज असते आत्मविश्‍वासाची. अनेकदा विद्यार्थी यासाठी मानसोपचारतज्ज्ञांचीही मदत घेताना दिसतात. अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाकडून हेल्पलाईनही सुरू आहेत. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

परीक्षा काळात या गोष्टी पाळा परीक्षेच्या एक दिवस आधी संपूर्ण पुस्तक वाचणे आणि लक्षात ठेवणे कठीण जाते. अशावेळी पाठ किंवा उत्तराची समरी वाचून लक्षात ठेवावी  अभ्यासाचे वेळापत्रक तयार करणे आणि त्याचे पालन करणे महत्त्वाचे आहे. वेळापत्रक एका कागदावर लिहून अभ्यासाच्या टेबलसमोर लावावे. जो भाग कठीण असेल तो सकाळच्या वेळी किंवा झोपण्याआधी वाचावा. तेव्हा आपली स्मरणशक्ती तल्लख असते. तासन तास अभ्यास करू नये. प्रत्येक तासाने 10 ते 15 मिनिटाचा ब्रेक घ्यावा. नकारात्मक विचारामुळे परीक्षेचा तणाव वाढतो. नकारात्मक विचार करण्यापेक्षा अधिक मेहन घेेणे महत्त्वाचे असते. मानसिक तणाव कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी खेळ, योग करावा.