Sat, Nov 17, 2018 07:54होमपेज › Belgaon › धारवाडमध्ये आढळले प्राचीन शिवलिंग 

धारवाडमध्ये आढळले प्राचीन शिवलिंग 

Published On: Feb 11 2018 12:54AM | Last Updated: Feb 10 2018 10:42PMधारवाड : वार्ताहर      

जन्नतनगरातील झोपडपट्टी भागात छोट्या मंदिरात शिवलिंग आढळले आहे. शिवलिंग अत्यंत प्राचीन असल्याचे सांगण्यात येते.

काही वर्षांपूर्वी या शिवलिंगाची पूजा करणार्‍या स्वामींनी येथील शिवलिंग बाजूला काढून ठेवले. काही दिवसांनी स्वामीला त्रास होऊ लागल्याने स्वामीने ती जागा सोडली. येथे आज भाविक शिवलिंगाच्या पूजेसाठी येत असतात.  या परिसरात राहणार्‍या हनुमंतप्पा करेगल नामक व्यक्‍तीने सांगितले की, शिवलिंग पूर्वीच्या ठिकाणी नेऊन तेथे नवे मंदिर बांधण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.