Sat, May 30, 2020 00:10होमपेज › Belgaon › 'पाकिस्तान जिंदाबाद' नारा देणारी अमुल्या म्हणते, मी फक्त चेहरा, माझ्यामागे मोठी टीम कार्यरत!

'पाकिस्तान जिंदाबाद' नारा देणारी अमुल्या म्हणते, मी फक्त चेहरा, माझ्यामागे मोठी टीम कार्यरत!

Last Updated: Feb 22 2020 10:15AM
बंगळूर : पुढारी ऑनलाईन 

'पाकिस्तान जिंदाबाद' अशी घोषणा देणारी अमूल्या लिओन चांगलीच चर्चेत आली आहे. बंगळूरमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात आयोजित मोर्चात तिने घोषणा देऊन चांगलाच वाद निर्माण केला आहे. सोशल मीडियावर तिला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. 

अधिक वाचा : 'कोण वारीस पठाण? ज्या ठिकाणी बोलवाल तिथं एकटा येतो आणि...'

गुरुवारी रात्री अमुल्याच्या घरावर हल्ला करून खिडक्या तोडण्यात आल्या. दरम्यान, अमूल्यचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती म्हणत आहे की ती एकटी नाही. तिच्या म्हणण्यानुसार ती जे काही करत आहे त्याकरिता अनेक जणांची टीम कार्यरत आहे. ती फक्त एक चेहरा आहे. तथापि, हा व्हिडिओ 'पाकिस्तान झिंदाबाद' च्या घोषणेपूर्वीचा आहे. अमुल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनाही लक्ष्य केले जात आहे.

अधिक वाचा : 'मुस्लिमांना त्याच वेळी पाकला पाठवून न देणे ही पूर्वजांची चूक'

अमूल्या व्हिडिओमध्ये म्हणत आहे की, 'आज मी जे काही करत आहे ते मी करत नाही. मीडियामुळे मी त्याचा चेहरा झालो आहे. अनेक सल्लागार समित्या माझ्यामागे काम करतात. ते लोक आज भाषणात हे सांगावे लागेल, ते मुद्दे आहेत. बरेच ज्येष्ठ कार्यकर्ते यासाठी काम करतात. माझे पालक मला कसं  बोलायच आहे, कोणत्या ठिकाणी जायचं आहे, याची माहिती देतात. या सर्व घटनांमागे एक मोठा विद्यार्थी गट कार्यरत आहे त्याचे नाव बंगळूर स्टूडेन्ट अलायन्स आहे. मी फक्त त्याचा चेहरा आहे, परंतु बंगळूर स्टूडेन्ट अलायन्स खूप मेहनत घेत आहे. '

अधिक वाचा : कोण म्हणाले नागुपरातील संघाच्या मुख्यालयासमोर तिरंगा फडकवणार?

या घटनेनंतर अमुल्याच्या वडिलांनी या वक्तव्याला आक्षेपार्ह म्हटले आहे आणि तिच्यावर टीकास्त्र सोडले होते. माझ्या मुलीचे वक्तव्य मी सहन करणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. माझ्या मुलीने जे काही सांगितले किंवा केले आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे, ते सहन केले जाणार नाही. पण आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांची बोलती बंद झाली आहे.

एएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीत बंगळूरमध्ये सीएएविरूद्ध रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत व्यासपीठावर असणार्‍या १९ वर्षीय अमूल्या लियोनने पाकिस्तान जिंदाबादचा जयघोष केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तिला कडक टीकेला सामोरे जावे लागले. तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

अधिक वाचा : 'पाकिस्तान जिंदाबाद' नारा देणारी अमुल्या म्हणते, मी फक्त चेहरा, माझ्यामागे मोठी टीम कार्यरत!

अमुल्या विद्यार्थीनी कार्यकर्ती आहे. ती बंगळूरच्या एनएमकेआरव्ही कॉलेजमधून पत्रकारितेचा अभ्यास करत आहे. तिने या ठिकाणी पदवसीसाठी प्रवेश घेतला आहे. त्याआधी तिने सेंट नॉर्बर्ट सीबीएसई स्कूल, क्राइस्ट स्कूल मणिपाल आणि सेंट जोसेफ स्कूल कोप्पा येथूनही शिक्षण घेतले आहे. सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असणारी अमूल्या मूळची चिक्कमंगळूरची आहे.