Thu, Mar 21, 2019 15:29होमपेज › Belgaon › सुभाष जोशींच्या मागे लोकप्रेमाची मोठी पुण्याई

सुभाष जोशींच्या मागे लोकप्रेमाची मोठी पुण्याई

Published On: Apr 24 2018 1:05AM | Last Updated: Apr 24 2018 12:31AMनिपाणी : प्रतिनिधी

आयुष्यभर निष्ठावंत राहत व सेवाभावी वृतीने गोरगरीब व कष्टकर्‍यांच्या उध्दारासाठी माजी आम. प्रा. सुभाष जोशी यांनी निष्कलंक राहत सेवाभावी वृतीने कष्टकरी उपेक्षित व शेतकर्‍यांसाठी आपले आयुष्य समर्पित केले. त्यामुळे त्यांच्यावर लोकांनी प्रेम केले. लोकप्रेमाची मोठी पुण्याई त्यांच्या मागे असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केले.

हालशुगरचे चेअरमन, कामगार नेते माजी आम. प्रा. सुभाष जोशी यांचा अमृतमहोत्सव वाढदिवस कार्यक्रम माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी  समर्थ व्यायामशाळेच्या मैदानावर पार पडला. यावेळी प्रा.जोशी यांचा सपत्निक सत्कार पवार यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.अध्यक्षस्थानी कर्नाटकचे उद्योगमंत्री आर. व्ही. देशपांडे होते.

पवार पुढे म्हणाले, माजी आ. प्रा. जोशी यांनी निपाणी मतदारसंघाचे दोनवेळा प्रतिनिधित्व करत दिनदलित, शेतकरी, शेतमजूर, तंबाखू व बिडी कामगारांसह सर्वसामान्यांसाठी आयुष्य खर्ची घातले आहे. त्यांनी सहकार क्षेत्रासाठी दिलेले योगदान फार मोठे आहे. शिवाय कष्टकरी जनतेसाठी त्यांनी केलेले सहकार्य अफाट आहे. म्हणून त्यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात इतक्या मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित आहे.

प्रारंभी शाल, श्रीफळ, मानपत्र तसेच चांदीची तलवार देऊन जोशी यांचा शरद पवार यांच्या हस्ते तर पत्नी सुनीता जोशी यांचा  हालशगुरच्या व्हा.चेअरमन अनिता पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराबद्दल माजी आ.जोशी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी नगराध्यक्ष विलास गाडीवडर, उपनगराध्यक्ष सुनील पाटील, युवा नेते उत्तम रावसाहेब पाटील, पंकज पाटील, सुजय पाटील, धनजंय देशपांडे, शंतनू मानवी, वल्लभ देशपांडे, जि.प.सदस्य राजेंंद्र वडर, रवींद्र खोत, बी.आर.पाटील, बी. रमेश पै, प्रकाश बाडकर, एम. पी. कुलकर्णी, आर.वाय.चिकोडी, बाबुराव मगदूम, नितीन नेपीरे, प्रभाकर पोकले, मारूती कोळेकर, अशोक पावले, बाळासाहेब जासूद, अ‍ॅड. अविनाश कट्टी, प्रा.बाळासाहेब सूर्यवंशी, रवीराज पाटील, रावसाहेब खोत, आनंद गिंडे, राजू पाटील, रोहन साळवे, सुरज पाटील, रवींद्र कदम, हालशुगरचे संचालक चंद्रकांत कोठीवाले, पप्पुअण्णा पाटील, चंद्रकांत जासुद, कुमार पाटील, राजू खिचडे, अण्णासाहेब हावले, अशोक पाटील, वैभव पाटील, भगवंत पाटील, प्रकाश इनामदार, निकू पाटील, भैरू बोंगाळे, प्रकाश गोईलकर, संजय  स्वामी, बाळकृष्ण शिंदे, दिलीप कांबळे, चंद्रकांत पाटील, पिंटू पाटील यांच्यासह हालशुगरचे संचालक, आजी- माजी नगरसेवक, विविध संघ संस्थांचे पदाधिकारी, जि.पं. व ता.पं.सदस्य पीकेपीएसचे  ेअरमन, संचालक, सभासद आदींनी उपस्थित राहून माजी आ. प्रा. सुभाष जोशी यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास निपाणी मतदासंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.