Fri, May 24, 2019 09:24होमपेज › Belgaon › अमित शहांची 400 जणांची फौज!

अमित शहांची 400 जणांची फौज!

Published On: Mar 09 2018 1:33AM | Last Updated: Mar 08 2018 11:55PMबेळगाव : प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुका कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा चंग भाजपने बांधला आहे. यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न करण्यात येत असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून थेट गुजरातहून तज्ज्ञांची फौज आणण्यात येणार आहे. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची तयारी करण्यात येणार आहे.

काँग्रेसच्या ताब्यात असणारे राज्य हिसकावून घेण्यासाठी भाजप सज्ज झाले आहे. यासाठी व्यापक प्रचार मोहीत हाती घेण्यात आली आहे. यासाठी निवडणूक तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. त्यांच्या माध्यमातून राज्यातील बारिकसारिक घटनांवर नजर ठेवण्यात येणार आहे.शहर आणि ग्रामीण भागातील घडामोडीवर नजर ठेवण्यासाठी 400 जणांची टीम कार्यरत राहणार आहे. सध्या राज्यात वेगवेगळया जनमत चाचण्या घेण्यात येत आहेत. त्यामध्ये काँग्रेस पक्ष सरस असल्याचे दिसून येत आहे. यामुळे भाजपाकडून पुरेशी खबरदारी घेण्यात येत असून कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सत्तारुढ काँग्रेस सरकारवर हल्लाबोल करण्याचे आदेश अमित शहा यांनी राज्यातील नेत्यांना दोन महिन्यापूर्वीच बजावले आहेत. काँग्रेसचे अपयश जनतेसमोर नेण्यासाठी मोहीम सुरू करण्याचे आदेश देऊनही अपेक्षित परिणाम राज्यात दिसत नाहीत. यामुळे समाजमाध्यमांचा वापर वाढविण्यात येणार आहे.गुजरातहून 400 तज्ज्ञ राज्यात येणार असून त्यापैकी 250 जण सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यरत राहणार आहे. सध्या राज्यात असणार्‍या भाजपच्या ‘वॉर रुम’सोबत ही टीम कार्यरत राहणार आहे. उर्वरित 150 जण तज्ज्ञ राज्यातील घडामोडीवर नजर ठेवून राहणार आहेत.