Tue, Aug 20, 2019 04:09होमपेज › Belgaon › अमित शहा यांना बैलहोंगल येथील शेतकर्‍यांची आत्महत्येची धमकी

अमित शहा यांना बैलहोंगल येथील शेतकर्‍यांची आत्महत्येची धमकी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

बैलहोंगल तालुका युनिट भाजपचे रयत मोर्चाचे अध्यक्ष बसनगौडा सिद्रामणी यांच्यावर कारवाई करण्यास अपयशी ठरल्याने बैलहोंगल येथील शेतकर्‍याींन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना त्यांच्या बेळगाव जिल्हा दौर्‍याच्यावेळी सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.

बसनगौडा सिद्रामणी यांनी शेतकर्‍यांची फसवणूक करून त्यांच्या जमिनी हिसकावून घेण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे बैलहोंगल तालुक्यातील शेतकरी संतप्त बनले आहेत. बैलहोंगल येथील शेतकर्‍यांनी 1 एप्रिल रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह करून बसनगौडा सिद्रमनी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. सदर शेतकर्‍यांनी केवळ आपली जमीनच गमावली नाही तर शेत जमिनीला योग्य किंमत आकारण्यात यावी यासंबंधीही त्यांची फसवणूक केली आहे.

बसनगौडांनी 22 एकर जमीन सर्व्हे नंबर 501, 502 अशी बैलहोंगल तालुक्यातील शेतजमीन योग्य किंमत देण्याऐवजी कवडीमोलाने खरेदी केली आहे. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची तक्रार लिंबेप्पा कुरबूर व इतर शेतकर्‍यांनी केली आहे. त्यांच्या फसवणुकीमुळे 12 शेतकरी कुटुंबे निराधार बनली आहेत. या प्रकरणाची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी चौकशी करून बसनगौडा सिद्रामनी यांच्यावर कठोर कारवाई करावी नाहीतर आम्ही तुमच्यासमोर सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा त्या शेतकर्‍यांनी दिला आहे.


  •