Tue, Sep 25, 2018 00:47होमपेज › Belgaon › अमित शहा आज बेळगावात

अमित शहा आज बेळगावात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे सोमवारी  बेळगाव जिल्ह्यासह उत्तर कर्नाटकाच्या दौर्‍यावर येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने या दौर्‍याची तयारी केली आहे. 

सोमवारी (दि. 2) सकाळी 9.30 वा. कित्तूर येथील कित्तूर चन्‍नम्मा यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर 10.30 वा. बेळगावमधील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन, 11 वा. संत बसवेश्‍वर यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील. दुपारी 12 वा.  केएलई संस्थेच्या डॉ. बी. एस. जिरगे सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद, 3 वा. चिकोडी तालुक्यातील कोथळी येथे जैन समाजबांधवाशी संवाद, निपाणी येथे 4 वा. महिला संमेलनात सहभाग, सायं. 6 वा. गोकाक येथे रथयात्रेत भाग घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी बागलकोटला प्रयाण करतील.

बागलकोटमध्ये शिवयोगी मठामध्ये लिंगायत वीरशैव समाजाशी चर्चा, त्यानंतर मुधोळमध्ये रोड शो मध्ये सहभागी होतील. सायंकाळी बेळगावला येऊन ते हुबळीमार्गे बंगळूरला प्रयाण करणार आहेत. 

Tags : Amit Shah, today, Belgaum,


  •