Thu, Apr 25, 2019 16:00होमपेज › Belgaon › देश संरक्षणासाठी सतत प्रयत्नशील राहा : एअर व्हाईस मार्शल

देश संरक्षणासाठी सतत प्रयत्नशील राहा : एअर व्हाईस मार्शल

Published On: Jun 16 2018 1:28AM | Last Updated: Jun 15 2018 11:37PMबेळगाव : प्रतिनिधी

प्रशिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया असून त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानानुसार बदल होत गेले आहेत. प्रत्येक प्रशिक्षणार्थीने आपले कौशल्य  वाढीस लावले पाहिजे. भारतीय हवाई दलामध्ये वैयक्तिरित्या प्रगती करण्याकरिता खूपच वाव आहे. प्रत्येकाने भारतीय हवाई दलाची परंपरा पुढे नेण्यासाठी व देशाचे संरक्षण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे आवाहन एअर व्हाईस मार्शल एस. पी. धारकर यांनी केले.

सांबरा येथील हवाई दल प्रशिक्षण स्कूलमधून 3106 प्रशिक्षणार्थींनी आपले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. त्या प्रशिक्षणार्थींनी यानिमित्ताने पासिंग आऊट परेड सादर केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एस. पी. धारकर  उपस्थित होते. एअर कमाडोर अरुण भास्कर गुप्ता यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी प्रशिक्षणार्थींच्या पासिंग आऊट परेडची पाहणी केली. 

धारकर पुढे म्हणाले, कौशल्य व गुणवत्तेवर हवाई दलामध्ये प्रत्येकाचा विकास होतो. प्रत्येक प्रशिक्षणार्थीने आपल्या जीवनात शिस्त व कौशल्य मिळविण्यावर भर दिला पाहिजे. हवाई दलामार्फत लढाई करण्याच्यादृष्टीने प्रत्येक प्रशिक्षणार्थीने आपली बाजी लावली पाहिजे.  यावेळी प्रशिक्षणार्थींचे आई-वडील उपस्थित होते. उत्कृष्ट प्रशिक्षणार्थींना प्रमुख पाहुणे एस. पी. धारकर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. जनरल सर्व्हिसमध्ये उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून विवेक राजेंद्र खाडे याला व प्रशिक्षणामध्ये उत्कृष्ट म्हणून आयजाज खान, मोहितकुमार सेन याला उत्कृष्ट गुणवत्ताधारक व सर्वच प्रशिक्षणामध्ये उत्कृष्ट म्हणून रोहित शर्मा यांना पुरस्कार देण्यात आले.