होमपेज › Belgaon › बेळगावातही अ‍ॅलर्ट

बेळगावातही अ‍ॅलर्ट

Published On: May 25 2018 1:08AM | Last Updated: May 24 2018 11:44PMबेळगाव : प्रतिनिधी

बालकचोर टोळीच्या अफवांची धास्ती बेळगावकरांनीही घेतली आहे. परराज्यातील टोळी लहान मुलांचे अपहरण करण्यासाठी फिरत असल्याची अफवा सोशल मीडियावरूनही पसरवली जात आहे. मात्र, त्यावर विश्‍वास ठेवू नका, असे आवाहन पोलिस आयुक्‍त डॉ. डी. सी. राजप्पा यांनी केले आहे. अनेक पालक भयभीत झाले आहे.  त्यामुळे पोलिसांनी बेळगावात अलर्ट जारी केले आहे.बंगळुरात बुधवारी घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.  क्षणार्धात ही टोळी मुलांचे अपहरण करून नेते. त्यामुळे पालकांनी खबरदारी घ्यावी. सर्व पालकांत जागृती करावी, असे संदेशात म्हटले आहे. 

दोन दिवसांपासून सोशल मीडियावर बालकचोर टोळीचा संदेश फिरत आहे. ती अफवा असून त्यावर विश्‍वास ठेवू नये. अशा प्रकारच्या संदेशाची शहानिशा केल्यानंतरच विश्‍वास ठेवावा. या संदेशाचा प्रसार करू नये.

- डॉ. डी. सी. राजप्पा, 

पोलिस आयुक्‍त, बेळगाव