Sun, Jul 21, 2019 08:17होमपेज › Belgaon › बंगळूरसाठी रोज सेवा, एअर इंडिया, अलायन्सच्या दरात दीड हजाराचा फरक

बंगळूरसाठी रोज सेवा, एअर इंडिया, अलायन्सच्या दरात दीड हजाराचा फरक

Published On: Aug 12 2018 1:01AM | Last Updated: Aug 11 2018 11:12PMबेळगाव : प्रतिनिधी

एअर इंडियाच्या बेळगाव-बंगळूर विमानसेवेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. त्यामुळे आता बेळगावहून बंगळूरला येण्या-जाण्यासाठी रोजच सुविधा उपलब्ध झाली आहे. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दोन दिवसांपासून रोज शंभरहून अधिक प्रवाशांची ये-जा सुरु आहे.मात्र एअर इंडिया आणि अलायन्सच्या तिकीटदरात सुमारे दीड हजार रुपयांचा फरक आहे. यामुळे अलायन्सचे प्रवाशी रोडावण्याची शक्यता आहे.

एअर इंडियाची सेवा सोमवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार अशी आठवड्यातून चार दिवस असणार आहे. बंगळूरला जाणे किंवा येण्यासाठी तासाचा अवधी लागणार आहेे. यासाठी 2165 रुपये भाडे आकारले जाणार आहे. प्रत्यक्षात तिकीटचा दर 1800 रुपये असून सर्व करासह तो 2165 रुपये आहे.

हे विमान बंगळूरहून सकाळी 7.25 ला सुटणार असून 8.30 ते बेळगावला पोहचेल. परतीच्या प्रवासात बेळगाहून सकाळी 9.30 वाजता निघून 10.30 वाजता बंगळूरला विमान पोहचेल.

एअर इंडियाची उपकंपनी असलेली अलायन्स एअरची सेवा आठवड्यातून तीन दिवस सुरुच आहे. ही सेवा मंगळवार, बुधवार आणि शनिवारी आहे.  हे विमान बुधवारी आणि शनिवारी दुपारी 3.30 वाजता बेळगावला येऊन दुपारी 4  वाजता बेळगावहून बंगळूरला जाणार आहे. यासाठी सर्व करासहीत तिकीट दर 3 हजार 500 रुपये आहे. एअरबस 219 मध्ये 122 आसने आहेत. त्यामध्ये 8 आसने बिझनेस क्‍लास आहेत. अलायन्स एअरमध्ये आसन क्षमता 70 आहे, अशी माहिती सांबरा विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी दिली. 

असे काढावे तिकीट

विमानतळावरच तिकीट खिडकी सुरू करण्यात आली आहे. ही खिडकी सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुली राहील. ज्यांच्या नावाचे तिकीट हवे हवे, त्यांच्या नावाचे फोटो असलेले ओळखपत्र आवश्यक आहे. हा पुरावा प्रवासाला जातानाही आवश्यक आहे. आधार कार्ड, पॅनकार्ड, चालक परवाना यापैकी कोणतेही एक ओळखपत्र हने, तिकीट ऑन लाईन बुक करु शकता किंवा एजन्सीमार्फतही तिकीट काढण्याची सोय करण्यात आली आहे. जितके अगोदर तिकीट बुक करता येईल तितकी तिकीट दरामध्ये सूट मिळणार आहे.