Tue, Apr 23, 2019 06:32होमपेज › Belgaon › एअर इंडियाची विमानसेवा १० ऑगस्टपासून

एअर इंडियाची विमानसेवा १० ऑगस्टपासून

Published On: Jul 30 2018 1:28AM | Last Updated: Jul 30 2018 12:09AMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव-बंगळूरदरम्यान एअर इंडियाची विमानसेवा 10 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. आठवड्यातून चार दिवस ही विमानसेवा असेल. यामुळे अखेर बेळगावकरांचे स्वप्न पूर्ण होणार  आहे. 

बेळगाव ते बंगळूरदरम्यान सोमवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार असे चार दिवस एअर बस 319  ही विमानसेवा सुरू असेल. विमान बंगळूरहून निघून बेळगावला सकाळी 8.30 ला पोहोचणार आहे.  बेळगावहून 9.30 वाजता परत निघणार आहे.

स्पाईट जेटची विमान सेवा मेपासून बंद झाल्यानंतर बेळगावातून केवळ तीनच दिवस एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअरवेजची विमान सेवा सुरू आहे. मंगळवार, बुधवार आणि शनिवार हे तीन दिवस सेवा सुरू आहे. अलायन्स एअरवेजप्रमाणे एअर इंडियाची सेवा बेळगावधून सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन सिटिझन कौन्सिलतर्फे एअर इंडियाचे मुख्य संचालक एम. व्ही. जोशी यांना देण्यात आले होते. 

10 ऑगस्टपासून एअर इंडियाची बेळगाव-बंगळूर विमानसेवा सुरू होणार आहे. आठवड्यातून चार दिवस ती आहे. सध्या अलायन्स एअरवेजची सेवा तीन दिवस सुरू आहे. त्यामुळे सात दिवस बेळगावकरांना सेवा मिळेल.     - राजेशकुमार मौर्च, संचालक, सांबरा विमानतळ