Fri, Jul 19, 2019 13:33होमपेज › Belgaon › एअर इंडियाची विमानसेवा आजपासून

एअर इंडियाची विमानसेवा आजपासून

Published On: Aug 10 2018 12:56AM | Last Updated: Aug 09 2018 11:06PMबेळगाव : प्रतिनिधी

एअर इंडियाची बेळगाव-बंगळूर विमानसेवा शुकवारपासून सुरू होणार आहे. उद्घाटन सकाळी 8 वाजता सांबरा विमानतळावर खा. प्रकाश हुक्केरी यांच्या हस्ते होईल. आठवड्यातून चार दिवस सेवा दिली जाणार आहे. यासाठी सध्या 2165 रुपये तिकीट आकारले जाणार आहे.  सध्या एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या ‘अलायन्स एअर’ची सेवा आठवड्यातून तीन दिवस आहे. हे तीन दिवस वगळता आठवड्यातून सोमवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार हे चार दिवस एअर इंडियाची सेवा असणार आहे. 

विमान बंगळूरहून सकाळी 7.25 ला सुटणार असून 8.30 ते बेळगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात बेळगावहून सकाळी 9.30 वाजता निघून 10.30 वाजता बंगळूरला पोहचेल. उद्घाटनाला जिल्हाधिकारी एस. झियाउला, चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजचे अध्यक्ष उमेश शर्मा यांच्यासह संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती सांबरा विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी दिली.