Tue, Jul 23, 2019 02:43होमपेज › Belgaon › ‘कृषी कर्जमाफीचा आदेश गुरुवारी’

‘कृषी कर्जमाफीचा आदेश गुरुवारी’

Published On: Aug 14 2018 1:08AM | Last Updated: Aug 13 2018 11:24PMबंगळूर : प्रतिनिधी

निजदने विधानसभा निवडणुकीआधी जाहीरनाम्यामध्ये शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार 37 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यासाठी गुरुवारी (दि. 16) आदेश जारी केला जाणार आहे. हासन येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी ही माहिती दिली. आर्थिक शिस्तीचे पालन करताना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली आहे. बँकांना पुढील वर्षी सर्व रक्‍कम दिली जाईल, असे ते म्हणाले.