Fri, Jul 19, 2019 05:21होमपेज › Belgaon › चिंचमार्केटचे लवकरच एपीएमसीत स्थलांतर 

चिंचमार्केटचे लवकरच एपीएमसीत स्थलांतर 

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 22 2018 7:54PMबेळगाव : प्रतिनिधी  

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) आवारात भाजी मार्केट, सण्डे मार्केट याबरोबरच सध्या सुरू असलेले कडधान्य, गूळ, कांदा, बटाटा, रताळी आदी बाजारपेठा एकाच छताखाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन वर्षांपूर्वी चिंचमार्केट व्यापारी संघटनेने केलेल्या मागणीनुसार एपीएमसी आवारात हे मार्केट लवकरच स्थलांतरित करण्यात येणार आहे.  यावर विद्यमान बाजार समितीने शिक्कामोर्तब केला आहे. ग्राहकांना अत्यावश्यक वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, व्यापार्‍यांना व्यवहार करण्यास सोयीचे व्हावे, या उद्देशाने एपीएमसी बाजारपेठेचा विकास करण्याच्या दृष्टीने बाजारपेठ आवारात नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. याबरोबरच बाजारपेठांसाठी आवश्यक सुविधा देण्यात येत आहेत.  

वाहनांची वाढती रहदारी व जागेचा आभाव यामुळे अनेक व्यापारी संघटना एपीएमसीमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. त्यानुसार एपीएमसीकडून व्यापारी संघटनांच्या मागणीनुसार जागेची व्यवस्था करून देण्यात येत आहे. एपीएमसीच्या आवारात चिंचमार्केट व्यापार्‍यांना जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करून चिंचमार्केट व्यापारी संघटनेतर्फे एपीएमसी सचिवांसह अध्यक्षांना दोन वषार्ंपूर्वी निवेदन दिले होते. मात्र यावर कोणताच निर्णय घेण्यात आला नव्हता. ही मागणी गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित आहे. या संदर्भात व्यापारी संघटनेने केलेल्या पाठपुराव्यानुसार एपीएमसी सचिवांनी याची दखल घेतली. बाजारपेठ आवारात चिंचमार्केटसाठी सहा गाळे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार गाळ्यांचे काम सुरू असून लवकरच मार्केट व्यापार्‍यांना ते हस्तांतरित करण्यात येणार आहेत.