Sat, Feb 23, 2019 17:11होमपेज › Belgaon › पहिली प्रवेश वयोमर्यादेत वाढ

पहिली प्रवेश वयोमर्यादेत वाढ

Published On: Jun 18 2018 1:09AM | Last Updated: Jun 17 2018 11:44PMबेळगाव : प्रतिनिधी

राज्यातील सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील पहिलीच्या वर्गासाठी वयोमर्यादा वाढविण्यात आली आहे. पहिलीच्या वर्गासाठी 5 वर्षे 5 महिने ते 7 वर्षाच्या आतील विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार आहे, असे प्राथमिक शिक्षण विभागाचे सचिव व्ही. नागेश राव यांनी सांगितले. तसा आदेश त्यांनी काढला आहे. 

कर्नाटक शिक्षण कायदा 1983 मधील कलम 20 व शिक्षण हक्क कायदा 2009 मधील विभाग 12 (1) नुसार राज्याच्या शिक्षण खात्याने निर्णय घेतला आहे. 

आधीच्या आदेशानुसार पहिलीच्या वर्गासाठी 5 वर्षे 10 महिने पूर्ण झालेल्या व 6 वर्षे 10 महिने आतील मुलांना प्रवेश दिला जात होता. यापूर्वी एलकेजी प्रवेश 3 वर्षे 10 महिने ते 4 वर्षे 10 महिने पर्यंतच्या वयोमर्यादा असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता.  आता शिक्षण खात्याने दोन महिन्यांनी वाढ केली आहे. यापूर्वी शिक्षण खात्याकडे काही पालकांनी तक्रार केली होती. एक दिवस कमी असला तरी पाल्यांला प्रवेश दिला जात नव्हता. याची दखल घेऊन शिक्षण खात्याने हा बदल केला आहे.