Fri, Apr 19, 2019 12:14होमपेज › Belgaon › गौरी लंकेश हत्येनंतर शस्त्रांची बाजारपेठ उघड 

देशी पिस्तूलींसाठी विजापूर, बेळगाव चर्चेत

Published On: Jun 15 2018 1:04AM | Last Updated: Jun 15 2018 12:16AMबंगळूर : प्रतिनिधी 

गौरी लंकेश हत्येप्रकरणी दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेला परशुराम वाघमारे याने विजापूर जिल्ह्यातून पिस्तूल खरेदी केली होती, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शस्त्रांचा अवैध बाजार विजापूरसह उत्तर कर्नाटकात जोरात असल्याचेही विशेष तपास पथकाचे म्हणणे आहे.

शहरात जातीय दंगली माजविणे, बसेसवर स्वत:च दगडफेक करणे अशा कृती परशुराम करीत होता. पिस्तूल चालविण्यात ते पटाईत होता, अशी माहिती आरोपींनी दिली आहे. गुलबर्गा जिल्ह्याच्या सोन्न व देवनगांव (जि.विजापूर) सीमेवर पिस्तुलांची अवैध विक्री करण्यात येते. हा भाग सिंदगी गावानजीक असल्याने परशुराम याने तेथूनच पिस्तूल खरेदी केले होते. 

विजापूर, गुलबर्गा आणि बेळगाव पट्ट्यात देशी शस्त्रांचा मोठा व्यापार चालत असल्याचे एसआयटीचे म्हणणे आहे. 10 ते 15 हजार रुपयात देशी बनावटीची पिस्तुल सहज उपलब्ध होते. उत्तर कर्नाटकात गुन्हेगारीही जास्त असल्यामुळे देशी बनावटीच्या पिस्तुलींचे उत्पादक सावजाच्या शोधातच असतात. मालमत्ता अथवा कौटुंबिक वाद निदर्शनास आला तर स्वत:हून हे उत्पादक आणि त्यांचे एजंट अशा लोकांशी संपर्क साधून पिस्तुल विकण्याचे अमिष देतात. असेही एसआयटीच्या तपासात निष्पन्‍न झाले आहे.

दरम्यान  आणखी एक आरोपी सिंदगीचा सुनील मडिवाळप्पा अगसर (वय 25) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडूनही माहिती मिळविण्यात येत आहे. सुनील हा श्रीराम सेनेचा कार्यकर्ता तर आहेच. शिवाय परशुराम याचा मित्र असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.

सुनीललाही चौकशीसाठी बंगळुरला आणण्यात आले आहे. हत्याप्रकरणात सुनीलची भूमिका काय होती, याची चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी प्रथम अटक करण्यात आलेल्या मद्दूर येथील के.टी.नवीनकुमार हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. उर्वरित 5 जणांची न्यायालयाची अनुमती घेऊन पोलिस कोठडीत चौकशी करण्यात येत असल्याचे अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

गौरी यांच्यावर गोळी झाडून दुचाकीवरून फरार झालेल्या मारेकर्‍यांचा तपास लावणे  आरोपींच्या चौकशीनंतर शक्य होणार असल्याचे शक्य होणार आहे. एसआयटी अधिकार्‍यांच्या एका तुकडीने महाराष्ट्रात जाऊन तपास चालविला असल्याचे सांगण्यात येते.पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश हत्याप्रकरणी अटकेत असलेला श्रीराम सेनेचा कार्यकर्ता परशुराम अशोक वाघमारची विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) अधिकार्‍यांनी कसून तपासणी चालविली आहे. 

विजापूर जिल्ह्याच्या सिंदगी येथील परशुरामला मंगळवारी एसीएमएम तृतीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला  24 जूनपर्यंत न्यायालयानी कोठडी दिली आहे.  गौरी यांच्या हत्येसंबंधीची सीसीटाव्ही कॅमेर्‍यातील  छायाचित्रांची पाहणी करून बुधवारी गौरी लंकेश यांच्या राजराजेश्वरीनगरातील निवासस्थानासमोर  मारेकरी परशुराम याला नेले. तेेथे हत्याप्रकरण कसे घडले असावे, याचा परामर्श घेतला.

आरोपी परशुरामची उंची 5 फूट  ? 1 इंच असून त्याचे वजन 80 किलोपर्यंत आहे. गौरी यांच्या हत्येनंतर सीसीटाव्हातील छायाचित्राच्या आधारे एसआटीने चार आरोपींची रेखाचित्रे प्रसिध्द केली होती. छायाचित्रांची पाहणी केलेल्या विधिविज्ञान प्रयोगशाळेने 5.1 फूट किंवा 5.2 फूट उंचीच्या 70 किलो वजनाच्या व्यक्तिकडून पत्रकार गौरी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याचे म्हटले होते. गौरी यांच्या राजराजेश्वरीनगरातील निवासस्थानासमोर घडलेल्या हत्याप्रकरणाची आरोपी परशुराम याच्याकडून माहिती घेण्यात येत आहे. 

गौरी यांच्या हत्येप्रकरणी अलिकडेच अटक झालेले शिकारीपूरच्या कप्पनहळ्ळी येथील  सुजित कुमार उर्फ प्रवीण (वय37), पुण्याचा अमोल काळे उर्फ भायसाब, अमित देगवेकर उर्फ प्रदीप (वय 28) व विजापूर जिल्ह्याच्या रत्नापूर येथील मनोहर दुंडप्पा यवडे उर्फ मनोज (वय 29) यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीचा आधार घेत परशुराम याला अटक करून न्यायालयासमोर हजर केल्याचे एसआयटीने म्हटले आहे.