Tue, Dec 10, 2019 13:32



होमपेज › Belgaon › ...तरच न्यायालयीन सुनावणी : अ‍ॅड. शिंदे

...तरच न्यायालयीन सुनावणी : अ‍ॅड. शिंदे

Published On: Dec 29 2017 1:35AM | Last Updated: Dec 29 2017 12:04AM

बुकमार्क करा




बेळगाव : प्रतिनिधी

शहरातून मराठा क्रांती मोर्चा विविध मागण्यांसाठी काढण्यात आला होता. त्यावेळी कोल्हापूर येथील शहाजीराजे भोसले या तरुणाने ‘मी बेळगावचा, बेळगाव महाराष्ट्राचे’ असा मजकूर लिहिलेला टी-शर्ट विक्री केल्याप्रकरणी खडेबाजार पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर खटला दाखल केला आहे; परंतु खडेबाजार पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयात दोषारोप दाखल केलेले नाही. त्यामुळे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तृतीय न्यायालयाचे न्या. संदीप रेड्डी यांनी जोपर्यंत पोलिस दोषारोप दाखल करीत नाहीत तोपर्यंत या खटल्याच्या सुनावणीसाठी पुढील तारीख देणार नाही, असा पवित्रा घेतल्याचे अ‍ॅड. महेश शिंदे यांनी स्पष्ट सांगितले.

भोसले यांच्या वतीने अ‍ॅड. महेश बिर्जे काम पहात आहेत. खटल्यातील शहाजीराजे भोसले हे कोल्हापूर येथून न्यायालयाच्या तारखेला बुधवारी उपस्थित होते.